Salman Khan: Tubelight didn’t work because I made people cry | ‘ट्युबलाईट’ सिनेमा का आपटला? एकदा सलमान खानचे उत्तर वाचा
‘ट्युबलाईट’ सिनेमा का आपटला? एकदा सलमान खानचे उत्तर वाचा

ठळक मुद्देसध्या सलमान ‘भारत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात कतरीना कैफ, दिशा पाटणी, तब्बू, जॅकी श्रॉफ असे सगळे कलाकार आहेत. या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

ईद आणि सलमान खानचा सिनेमा हे जणू समीकरण झाले आहे. सन २००८ पासून ईदच्या मुहूर्तावर आलेला सलमानचा प्रत्येक चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. सुल्तान, बजरंगी भाईजान, किक, दबंग, बॉडीगार्ड अशा अनेक चित्रपटांची नावे घेता येतील. याला अपवाद फक्त एक, तो म्हणजे, ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला सलमानचा ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा.
ईदच्या मुहूर्तावर रिलीज होऊनही ‘ट्युबलाईट’ फ्लॉप राहिला. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाने सलमानच्या चाहत्यांची कधी नव्हे इतकी निराशा केली. ‘ट्युबलाईट’ का फ्लॉप झाला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सलमानकडे याचे उत्तर तयार आहे.


होय, अलीकडे ‘भारत’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमान यावर बोलला. अर्थात ‘ट्युबलाईट’ फ्लॉप झाला, हे पूर्णपणे मानायला सलमान तयार नाही. पण होय, हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांच्या कसोटीवर खरा उतरला नाही, याची कबुली मात्र त्याने दिली. या चित्रपटासंदर्भात काय चुकले? असे सलमानला विचारले असता, तो यावर मनमोकळेपणाने बोलला. त्याने सांगितले की, ‘लोक माझ्या चित्रपटासोबत ईद साजरी करतात. पण ‘ट्युबलाईट’ने लोकांना रडवले. हा एक भावूक चित्रपट होता. माझ्यामते, ईदच्या मुहूर्तावर लोकांना दबंग, किक यासारखे अ‍ॅक्शनपॅक्ड मसाला चित्रपट पाहायला आवडतात. ‘ट्युबलाईट’सारखा रडवणारा चित्रपट म्हणूनच लोकांना आवडला नाही. त्यामुळेच या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. यानंतर टीव्हीवर अनेकांनी हा चित्रपट पाहिला. टीव्हीवर पाहिल्यानंतर हा चित्रपट आम्हाला आवडल्याचे अनेकांनी मला सांगितले.’


सध्या सलमान ‘भारत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात कतरीना कैफ, दिशा पाटणी, तब्बू, जॅकी श्रॉफ असे सगळे कलाकार आहेत. या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.


Web Title: Salman Khan: Tubelight didn’t work because I made people cry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.