ठळक मुद्देसलमान व आलिया पहिल्यांदाच दिसणार एकत्र


संजय लीला भन्साळी यांनी त्यांचा आगामी चित्रपट 'इंशाअल्लाह'च्या तयारीला सुरूवात केली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबतआलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला घेऊन एक वृत्त समोर आले आहे. या चित्रपटातून आलिया व संजय लीला भन्साळी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. टाईम्स नाऊने दिलेल्या रिपोर्टनुसार, आलिया या चित्रपटासाठी वजन वाढविणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर सलमान व आलिया ही जोडी चर्चेचा विषय बनली आहे. या दोघांचे चाहते सलमान व आलिया या दोघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या रिपोर्टनुसार, इंशाअल्लाह चित्रपटासाठी आलिया वजन वाढविणार आहे. खरेतर सलमान खानने संजय लीला भन्साळीला सांगितले की, आलिया माझ्यासमोर खूपच बारीक वाटेल. अशात मी वजन वाढवू शकत नाही. अशात आलियाने वजन वाढवावे असे मला वाटतेे.


तसे तर बॉलिवूडमध्ये येण्याआधी आलियाचे वजन जास्त होते. तिने अॅक्टिंगमध्ये करियर करण्यापूर्वी वजन घटविले होते.


इंशाअल्लाह चित्रपटात सलमानची निवड केल्यानंतर त्याने संजय लीला भन्साळी यांना आधीच सांगितले होते की, आलिया व मी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहोत. अशात आमची जोडी लोकांना विचित्र वाटली नाही पाहिजे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर आलियाने संजय लीला भन्साळी व सलमान खान यांच्यासोबत काम करण्याची इच्छा जाहीर केली होती.

त्यात संजय लीला भन्साळी व सलमान खान तब्बल वीस वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत.

यापूर्वी त्या दोघांनी हम दिल दे चुके सनममध्ये एकत्र काम केले होते.


Web Title: salman-khan-starrer-inshallah-alia-bhatt-gain-weight-for-character-sanjay-leela-bhansali
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.