भाईजानची सटकली, म्हणाला - माझ्या प्रोडक्शन कंपनीबद्दल अफवा पसरवू नका, अन्यथा…

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 04:09 PM2020-05-14T16:09:11+5:302020-05-14T16:09:43+5:30

सलमान खानने अफवा पसरवणाऱ्यांना दिली सक्त ताकीद

Salman Khan Slams Rumours He's Casting For Films, Warns Against Fake Messages TJL | भाईजानची सटकली, म्हणाला - माझ्या प्रोडक्शन कंपनीबद्दल अफवा पसरवू नका, अन्यथा…

भाईजानची सटकली, म्हणाला - माझ्या प्रोडक्शन कंपनीबद्दल अफवा पसरवू नका, अन्यथा…

googlenewsNext

बॉलिवूडचा दबंग खान सलमान लॉकडाउनमध्ये अनेक गरजवंताच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. तसेच लॉकडाउनमध्ये सलमान पनवेलच्या फार्महाउसमध्ये अडकला असून तिथेदेखील तो शांत बसला नाही. नुकतेच त्याची प्यार करोना आणि तेरे बिना ही दोन गाणी रिलीज झाली. ही दोन्ही गाणी स्वत: सलमानने लिहिली होती व त्यानेच गायली होती. या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सलमान आता एका चित्रपटाची निर्मिती करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठी तो नव्या कलाकारांचे कास्टिंग करत असल्याचे वृत्त व्हायरल होत होते. या अफवेमुळे सलमान खान खूप भडकला असून त्याने अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

सलमान खानने ट्विट केले की, “सलमान खानच्या कुठल्याही नव्या चित्रपटासाठी सध्या कास्टिंग सुरु नाही. आम्ही कुठल्याही एजेंटकडे नवे कलाकार शोधण्याची जबाबदारी सोपवलेली नाही. आपण या संबंधीत कुठल्याही मॅसेज किंवा इमेलवर विश्वास ठेवू नये. अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सलमान खान फिल्म कंपनी कायदेशीर कारवाई करणार आहे.

सलमानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमानच्या नव्या चित्रपटासाठी कास्टिंग सुरु नसल्याचे समजल्यावर काहींच्या आनंदावर विरजन पडले तर काही चाहत्यांनी या ट्विटसाठी सलमानचे आभारदेखील मानले आहेत.

Read in English

Web Title: Salman Khan Slams Rumours He's Casting For Films, Warns Against Fake Messages TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.