अलवीरावर जीवापाड प्रेम करायचा अतुल अग्निहोत्री पण, सलमानला घाबरायचा; एकदिवस...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 12:48 PM2021-01-10T12:48:18+5:302021-01-10T12:49:30+5:30

1996 साली अलवीराने अभिनेता अतुल अग्निहोत्रीसोबत लग्न केले. एका सिनेमाच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली.

salman khan sister alvira khan and atul agnihotri intersting love story | अलवीरावर जीवापाड प्रेम करायचा अतुल अग्निहोत्री पण, सलमानला घाबरायचा; एकदिवस...

अलवीरावर जीवापाड प्रेम करायचा अतुल अग्निहोत्री पण, सलमानला घाबरायचा; एकदिवस...

googlenewsNext
ठळक मुद्देअतुलने 1983 साली प्रदर्शित ‘पसंद’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पुढे त्याने अनेक सिनेमात काम केले.

सलमान खानची आई सलमा आणि दोन्ही बहिणी अर्पिता व अलवीरा यांना सोडले तर अख्खे खान कुटुंब फिल्म इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहे. अर्पिता बॉलिवूडच्या पार्ट्यांना तरी दिसते. पण अलवीरा मात्र लाईमलाईटपासून अगदी दूर असते. 1996 साली अलवीराने अभिनेता अतुल अग्निहोत्रीसोबत लग्न केले. अलवीरा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत असताना एका सिनेमाच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली.

सर्वप्रथम एका जाहिरातीच्या शूटवर अलवीरा व अतुल यांची पहिली भेट झाली होती. अर्थात तेव्हा केवळ हाय-बाय इतकीच ओळख होती. पुढे 1993 साली ‘जागृती’च्या शूटींगदरम्यान अतुल व अलवीराची जवळीक वाढली. पुढे दोघांतही चांगली मैत्री झाली. सलमान खान या सिनेमाचा हिरो होता, हे विशेष. या सिनेमानंतर अलवीरा व अतुल यांची मैत्री प्रेमात बदलली. दोघांनाही आता लग्न करायचे होते. पण त्याआधी अतुलला बरीच हिंमत गोळा करावी लागली. सलमान व त्याचे वडील सलीम खान त्याच्या व अलवीराच्या नात्यावर कसे रिअ‍ॅक्ट होतील, याची अतुलला भीती होती. त्यामुळे अतुल घाबरला होता.

मात्र एकदिवस अतुलने हिंम एकवटली आणि अलवीराचे वडील सलीम खान यांना भेटला आणि अलवीराशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय खान कुटुंबाने या लग्नासाठी होकार दिला आणि दोघांचे लग्न झाले.

अलवीरा व अतुलला अयान नावाचा मुलगा आणि एलिजा नावाची मुलगी अशी दोन मुलं आहे. अतुल आज खान कुटुंबाचा जावई नाही तर मुलगा झाला आहे. खान कुटुंबावर कुठलेही संकट येवो, अतुल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा दिसतो.
अतुलने 1983 साली प्रदर्शित ‘पसंद’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पुढे त्याने अनेक सिनेमात काम केले. अर्थात त्याला म्हणावे तसे यश लाभले नाही. 2004 साली त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ‘दिल ने जिसे अपना कहा’ आणि ‘हॅलो’ हे सिनेमे त्याने दिग्दर्शित केले. यानंतर निर्मिती क्षेत्रातही तो उतरला.

Web Title: salman khan sister alvira khan and atul agnihotri intersting love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.