जावयासाठी काय पण! आयुष शर्मासाठी सलमान खान बनवणार ‘या’ मराठी सिनेमाचा रिमेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 12:43 PM2020-03-01T12:43:40+5:302020-03-01T12:46:22+5:30

‘लव्हयात्री’ या चित्रपटातून आयुषचा धमाकेदार डेब्यू झाला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला आणि आयुषच्या करिअरला ब्रेक लागला.

salman khan shares screen with aayush sharma in the remake of Mulashi Pattern Marathi Movie-ram | जावयासाठी काय पण! आयुष शर्मासाठी सलमान खान बनवणार ‘या’ मराठी सिनेमाचा रिमेक 

जावयासाठी काय पण! आयुष शर्मासाठी सलमान खान बनवणार ‘या’ मराठी सिनेमाचा रिमेक 

googlenewsNext
ठळक मुद्देमुळशी तालुक्यातील गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता.

सलमान खानने अनेकांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. यापैकीच एक म्हणजे, आयुष शर्मा. ‘लव्हयात्री’ या चित्रपटातून आयुषचा धमाकेदार डेब्यू झाला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला आणि आयुषच्या करिअरला ब्रेक लागला. पहिलाच सिनेमा आपटला म्हटल्यावर अन्य निर्माते दिग्दर्शकांनीही आयुषमध्ये फार इंटरेस्ट दाखवला नाही. पण म्हणून सलमान थोडीच आयुषला वा-यावर सोडणार? शेवटी आयुष ठरला सलमानच्या लाडक्या बहिणीचा पती. मग काय, सलमान पुन्हा कामाला लागला आणि त्याने आयुषसाठी नवा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. होय, आता सलमान लवकरच आयुषसाठी नवा चित्रपट बनवणार आहे. विशेष म्हणजे,हा चित्रपट एका मराठी सिनेमाचा रिमेक असणार आहे.

होय, पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खान लवकरच 2018 मध्ये आलेल्या प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. या हिंदी रिमेकमध्ये आयुष मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

सलमानही यात सपोर्टिंग रोलमध्ये आहे. यात तो पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसेल. म्हणजे, सलमान असला तरी चित्रपटाची कथा आयुषभोवती फिरताना दिसेल. या चित्रपटासाठी आयुष गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा शिकत असल्याचेही कळतेय.

मुळशी तालुक्यातील गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. त्यामुळेच सलमानची नजर या चित्रपटावर गेली. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सलमान व अरबाज खानसाठी ‘मुळशी पॅटर्न’चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. सलमान व अरबाज दोघांनाही हा सिनेमा कमालीचा आवडला होता. यानंतर त्याने ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला. अद्याप या हिंदी रिमेकचे नाव काय असेल, हे कळलेले नाही. पण हो, येत्या काही दिवसांत या सिनेमाची अधिकृत घोषणा होणे मात्र निश्चित आहे.
 

Web Title: salman khan shares screen with aayush sharma in the remake of Mulashi Pattern Marathi Movie-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.