सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि निलम काळवीट शिकार प्रकरणाच्या सुनावणीसाठी जोधपूर कोर्टात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 07:12 AM2017-01-27T07:12:23+5:302017-01-27T12:42:23+5:30

हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, ...

Salman Khan, Saif Ali Khan, Tabu, Sonali Bendre and Nilam Kalimbeet filed for Jodhpur court hearing | सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि निलम काळवीट शिकार प्रकरणाच्या सुनावणीसाठी जोधपूर कोर्टात दाखल

सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि निलम काळवीट शिकार प्रकरणाच्या सुनावणीसाठी जोधपूर कोर्टात दाखल

googlenewsNext
साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, निलम यांच्यावर आहे. यावर आज जोधपूर कोर्टात सुनावणी होणार आहे. यासाठी सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम कोठारी कोर्टात पोहोचले आहेत. 28 साक्षीदारांच्या साक्षींवरून काही प्रश्नांची यादी बनवण्यात आली आहे आणि त्यावर या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जाणार आहे. या आधारवर पुढील सुनावणी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
या सुनावणीसाठी सलमान त्याची बहीण अल्विरा अग्निहोत्रीसोबत कोर्टात नुकताच पोहोचला. सलमान कोर्टात येणार असल्याने सकाळपासूनच कोर्टाच्या बाहेर सलमानच्या फॅन्सनी गर्दी जमली होती. त्यामुळे पोलिसांचा अधिक बंदोबस्त कोर्टाच्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे. 
काळवीटची हत्या केल्याचा सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, सोनम यांच्या सगळ्यांवर आरोप असला तरी या प्रकरणात मुख्य आरोपी सलमान खान आहे. सलमानने काळवीटाची शिकार केली त्यावेळी हे सगळेच त्याच्या जीपमध्ये होते आणि त्यांनी काळवीटाची शिकार करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले असा त्यांच्यावर आरोप आहे. 
सलमान यासाठी कालच जोधपूरला पोहोचला होता. विमानतळावर त्याचा बॉडीगॉर्ड शेरासह त्याला पाहाण्यात आले होते. 1998 साली काळवीटाची शिकार झाली होती. आज या प्रकरणाला 18 वर्षं झाले असले तरी यावर कोणालाच शिक्षा झालेली नाही.
या प्रकरणात सलमानने परवाना संपलेली शस्त्र बाळगल्याचादेखील आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नुकतीच अंतिम सुनावणी झाली. सलमानची यात निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

Web Title: Salman Khan, Saif Ali Khan, Tabu, Sonali Bendre and Nilam Kalimbeet filed for Jodhpur court hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.