सुपरस्टार सलमानचे वांद्रेतील घर छोटे असले तरी सलमानचे पनवेलमधील फार्म हाऊस हे भले मोठे आहे. हे फार्म हाऊस जवळजवळ १५० एकरचे असून तो अनेकवेळा तिथे राहायला जातो. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सलमान पणवेल येथील फार्महाऊसमध्येच होता. पणवेलच्या फार्महाऊसमध्ये वेगवेगळे काम करण्यात तो बिझी राहिला. त्याची प्रत्येक अपडेटतो चाहत्यांसह शेअर करायचा.


मात्र इतर सेलिब्रेटींप्रमाणे सलमान बंगल्यात न राहात फ्लॅटमध्ये का राहातो याविषयी त्यानेच एका चॅट शो मध्ये सांगितले होते. तो म्हणाला होता की, मी माझ्या आई-वडिलांसोबत राहू इच्छितो. त्यांना सोडून मी कुठल्याही बंगल्यात शिफ्ट होणार नाही. एखाद्या मोठ्या अलिशान बंगल्यापेक्षा हा फ्लॅट मला प्रिय आहे. कारण याठिकाणी माझे आई-बाबा राहतात. मी लहानपणापासून याठिकाणी राहिलो आहे. या अपार्टमेंटमधील सगळी माणसं मला माझ्या कुटुंबासारखी आहेत.

आम्ही लहान होतो तेव्हा खालच्या गार्डनमध्ये तासन् तास खेळायचो. अनेकदा तर थकून गार्डनमध्येच झोपायचो. आमच्यासाठी अपार्टमेंटमधील सगळी घरे आमचीच घरे होती. कोणाच्याही घरात जायचो. जेवायचो, खेळायचो. गॅलेक्सी अपार्टमेंटशी माझ्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. हे घर सोडून मला कुठेच जायचे नाही. मी कायम इथेच राहू इच्छितो.


सलमानचे गॅलेक्सीमधील घर देखील शानदार आहे. या अर्पाटमेंटमध्ये त्यांची दोन घरं असून एक घर ग्राऊंड फ्लोअरवर तर दुसरे फर्स्ट फ्लोअरवर आहे. सलमानचे आई वडील सलीम खान आणि सलमा खान पहिल्या मजल्यावर राहातात तर सलमान ग्राऊंड फ्लोअरवर राहातो. सलमानचे घर हे वन बीएचके असून यात एक छोटेसे किचन देखील आहे. हा फ्लॅट एल शेप मध्ये असून यातील बेडरूम १७० ते १९० सक्वेअर फूट इतकेच आहे.  

'बिग बॉस' शो सोडण्याच्या तयारीत होता सलमान खान, कारण वाचून व्हाल हैराण

बिग बॉस म्हटलं की सलमान खान असं समीकरण गेल्या कितीतरी सीझनपासून झाले आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार, सलमान खानने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, त्याला बिग बॉस सोडायचे होते. एकवेळ अशी आली होती जेव्हा सलमानला खूप ट्रोल केले जायचे.असे म्हटले जात होते की शो दरम्यान सलमान खान स्पर्धकांच्या आयुष्यात खूप हस्तक्षेप करतो. याच कारणामुळे तो ट्रोलर्सचा शिकार होतो. टोलर्सला हैराण होऊन सलमानला बिग बॉस सोडायचा होता. पण असे असले तरी. ट्रोलर्स पेक्षा चाहत्यांकडून मिळणार प्रेम हे कितीतरी जास्त आहे म्हणून सलमान म्हणाला मी हा शो सोडू शकलो नाही.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan Reveled Never Leave His Bandra Flat For A Bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.