ठळक मुद्देसई ही महेश मांजरेकरची मुलगी असून सलमान सध्या अनेक कार्यक्रमात तिच्यासोबत पाहायला मिळत आहे. सलमानने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर लाँच करत सई मांजरेकरची ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे.

सलमान म्हणतोय, मी हिच्यासाठी काहीही करू शकतो हे वाचल्यावर सलमानच्या आयुष्यात कोणी नवीन मुलगी आली का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... पण असे काहीही नाही. एका चित्रपटात सलमान हा संवाद म्हणताना दिसत आहे. त्याच्या दबंग 3 या चित्रपटातील हा संवाद असून प्रेक्षकांना तो भावत आहे. सलमान खानच्यादबंग 3 या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

दबंग या चित्रपटात चुलबूल पांडेच्या नायिकेच्या म्हणजेच रज्जोच्या भूमिकेत आपल्याला सोनाक्षी सिन्हाला पाहायला मिळणार आहे. पण त्याचसोबत या चित्रपटाद्वारे सलमान सई मांजरेकरला लाँच करत आहे. सई ही महेश मांजरेकरची मुलगी असून सलमान सध्या अनेक कार्यक्रमात तिच्यासोबत पाहायला मिळत आहे. सलमानने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर लाँच करत सई मांजरेकरची ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे.


सलमानने पोस्टर शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, हमारी इनोसेन्ट मासूम खुशी... या पोस्टरमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. दबंग 3 या चित्रपटाच्या एका संवादात मी खूशीच्या आनंदासाठी काहीही करू शकतो असे बोलताना सलमान दिसत आहे. 

दबंग 3 च्या ट्रेलरमध्ये चुलबूल पांडे म्हणजेच सलमान खान आपल्याला बोलताना दिसत आहे की, एक असतो पोलिस आणि एक असतो गुंड... पण मला हाक मारली जाते पोलिसवाला गुंड... त्यानंतर त्याच्यासोबत काम करणाऱ्या एक पोलिस त्याला प्रमोशनबद्दल विचारत आहे. त्यावर तो त्याच्या हाताला गोळी मारताना आपल्याला दिसत असून इतरांना तुम्हाला देखील प्रमोशन हवे आहे का असे चुलबुल पांडे विचारत आहे... हे ऐकताच त्यांच्यातील एक पोलिस चुलबुल पांडेला आय लव्हू यू बोलताना दिसत आहे आणि चुलबूल पांडे देखील आय लव्ह यू टू म्हणत त्याला रिप्लाय देत आहे.

Web Title: Salman Khan praises for dabang 3 actress Sai manjrekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.