OMG! दबंग सलमान खानला वाटते या गोष्टीची भीती, द कपिल शर्मा शोमध्ये त्यानेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:00 AM2019-05-29T06:00:00+5:302019-05-29T06:00:02+5:30

भारत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि कतरिना कैफ द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

Salman Khan phobia around lifts revealed on The Kapil Sharma Show | OMG! दबंग सलमान खानला वाटते या गोष्टीची भीती, द कपिल शर्मा शोमध्ये त्यानेच दिली कबुली

OMG! दबंग सलमान खानला वाटते या गोष्टीची भीती, द कपिल शर्मा शोमध्ये त्यानेच दिली कबुली

googlenewsNext
ठळक मुद्देमला बंद दरवाजाच्या लिफ्टची प्रचंड भीती वाटते. तसेच पारंपरिक बंदिस्त छोट्या लिफ्टची देखील भीती वाटते. या लिफ्टमध्ये चढल्यानंतर मला वाटते की, लिफ्टचे नट बोल्ट्स निखळतील. त्यामुळे अशा लिफ्टमध्ये जायलाच मी घाबरतो.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. त्यामुळे आता भारत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि कतरिना कैफ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणेज सलमान खानचद कपिल शर्मा शोचा निर्माता आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाचे खूपच चांगले प्रमोशन तो करणार आहे. कपिल आणि त्याची टीम सलमान आणि कतरिनासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. 


 
द कपिल शर्मा शो मध्ये कपिलने सलमानला विचारले की, अशी कोणती गोष्ट हे ज्याची तुला सगळ्यात जास्त भीती वाटते. यावर सलमानने सांगितलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण सलमानने या कार्यक्रमात संगितले की, “मला बंद दरवाजाच्या लिफ्टची प्रचंड भीती वाटते. तसेच पारंपरिक बंदिस्त छोट्या लिफ्टची देखील भीती वाटते. या लिफ्टमध्ये चढल्यानंतर मला वाटते की, लिफ्टचे नट बोल्ट्स निखळतील. त्यामुळे अशा लिफ्टमध्ये जायलाच मी घाबरतो.”

सलमानच्या या उत्तरानंतर कपिलने हाच प्रश्न कतरिनाला विचारला. त्यावर ती म्हणाली, “मला झुरळ आणि कोळ्यांची भीती वाटते.” 
त्यावर मस्करीत कपिलने तिला विचारले की, जर तिला भूत दिसले तर तिची प्रतिक्रिया काय असेल? यावर कतरिना हसत म्हणाली, “माझी भूतांसोबत खूपच छान मैत्री आहे. भूतं मला झुरळ आणि कोळ्याइतके घाबरवत नाहीत.”


 
 द कपिल शर्मा शो मध्ये सलमान आणि कतरिना आपल्या आयुष्यातील अनेक सिक्रेट शेअर करण्यासोबतच एक क्विझ देखील खेळणार आहेत. त्यात कतरिनाला कपिल सलमानबद्दल प्रश्न विचारणार आहे आणि तिला त्याच्याबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेणार आहे. शिवाय कतरिना तिच्या ‘चिकनी चमेली’ सारख्या काही लोकप्रिय गाण्यांवर थिरकणार देखील आहे.


 
सलमानने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर फोटो पोस्ट करत तो आणि कतरिना द कपिल शर्मा शो मध्ये येणार असल्याचे सांगितले होते. त्याने शेअर केलेल्या या फोटोत जीन्स, टी-शर्ट आणि जीन्स जॅकेटमध्ये तो हँडसम दिसत असून कतरिनाचे सौंदर्य साडीत खुलून आले आहे.



 

Web Title: Salman Khan phobia around lifts revealed on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.