Salman khan one more dashing look out From movie bharat | 'भारत'मधला सलमान खानचा आणखी एक दमदार लूक आऊट, फोटो पाहून फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन  
'भारत'मधला सलमान खानचा आणखी एक दमदार लूक आऊट, फोटो पाहून फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन  

ठळक मुद्दे सलमान या सिनेमात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'भारत' सध्या चर्चेत आहे. भारताच्या गाण्यांना याआधीच पसंती मिळली आहे. भारताचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने सलमान खानचा आणखी एक फोटो शेअर करत फॅन्सची उत्सुकता वाढवली आहे. सलमान या सिनेमात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. अलीने अनेक जणांसोबत चर्चा केल्यानंतर या सिनेमातील सगळे लुक्स ठरवले आहेत. अलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये भाईजान इंडियन नेव्ही ऑफिसरच्या ड्रेसमध्ये दिसतोय.


 'भारत' सिनेमात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भारताच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे, अशी या सिनेमाची कथा आहे.


भारतमध्ये सलमान खान, दिशासह कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर आणि तब्बू अशी कलाकारांची तगडी फौज आहे.  भारत सिनेमात अ‍ॅक्शन, रोमान्स आणि देशभक्ती पाहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात या सिनेमाची कथा उलगडण्यात येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत मर्यादित ठेवायचा नसल्यामुळे या सिनेमाला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


Web Title: Salman khan one more dashing look out From movie bharat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.