धकधक गर्ल आणि दबंग खान जेव्हा थिरकले त्यांच्या हिट गाण्यावर, तेव्हा रसिकही झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:57 PM2019-08-10T15:57:40+5:302019-08-10T16:01:03+5:30

'हम आपके है कौन' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये एका ग्रँड इव्हेंटमध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टसहित चित्रपटाशी निगडित सर्व लोक पोहोचले आणि त्यांनी हा दिवस साजरा केला.

Salman khan madhuri dixit dance Once Again On Hum Aapke Hain Koun won the hearts of Audienc | धकधक गर्ल आणि दबंग खान जेव्हा थिरकले त्यांच्या हिट गाण्यावर, तेव्हा रसिकही झाले फिदा

धकधक गर्ल आणि दबंग खान जेव्हा थिरकले त्यांच्या हिट गाण्यावर, तेव्हा रसिकही झाले फिदा

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाला नुकतीच पंचवीस वर्षं पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं हिंदी चित्रपटसृष्टीसह रसिकांमध्येही याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, यांनी चित्रपटात साकारलेल्या आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटात प्रेम आणि निशा ही जोडी लोकांना खूप आवडली होती. त्यासोबतच दोघांची लव्हस्टोरी, चित्रपटातील गाणी आणि त्यावरील सलमान आणि माधुरीचा डान्स लोकांना विशेष आवडला. चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये एका ग्रँड इव्हेंटमध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टसहित चित्रपटाशी निगडित सर्व लोक पोहोचले आणि त्यांनी हा दिवस साजरा केला. 


यावेळी सलमान आणि माधुरीने पुन्हा एकत्र येऊन त्यांच्या सुपरहिट गाण्यावर डान्स केला. या डान्सने उपस्थितांची मनं तर जिंकलीच, शिवाय साऱ्यांना २५ वर्षे मागे घेऊन जात जुन्या आठवणी ताज्या केल्या. या चित्रपटाला त्या वर्षी पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम पटकथा आणि लता मंगेशकर यांना खास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. १९९४ सालचा सर्वांत लोकप्रिय चित्रपट म्हणून 'हम आपके है कौन'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट १९९४ साली सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. जवळपास ७४ कोटींची कमाई चित्रपटाने केली होती. तिकीट खिडकीवर शंभर दिवस हा चित्रपट चालला होता.
 

Web Title: Salman khan madhuri dixit dance Once Again On Hum Aapke Hain Koun won the hearts of Audienc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.