पाहा, सलमान लॉन्च करणार असलेल्या प्रनूतनचे खास फोटो! काजोलशी आहे खास नाते!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 08:24 PM2018-09-17T20:24:17+5:302018-09-17T20:28:30+5:30

अभिनेता मोहनीश बहल याची मुलगी प्रनूतन बहल लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सलमान खान प्रनूतनला लॉन्च करतोय.

salman khan launching mohnish bahl daughter pranutan grand daughter of nutan and niece of kajol | पाहा, सलमान लॉन्च करणार असलेल्या प्रनूतनचे खास फोटो! काजोलशी आहे खास नाते!!

पाहा, सलमान लॉन्च करणार असलेल्या प्रनूतनचे खास फोटो! काजोलशी आहे खास नाते!!

googlenewsNext

अभिनेता मोहनीश बहल याची मुलगी प्रनूतन बहल लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सलमान खान प्रनूतनला लॉन्च करतोय.
ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्शने आज प्रनूतनच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा केली. मोहनीशची मुलगी प्रनुतनला सलमान बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. या चित्रपटात प्रनूतनसोबतच आणखी एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे झहीर इक्बाल. सलमानच्या प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटातून हे दोन नवोदित कलाकार आपल्या करिअरचा शुभारंभ करणार आहेत.


प्रनूतन हिची एक वेगळी ओळख म्हणजे, ती दिवंगत अभिनेत्री नूतन यांची नात आहे.. साहजिकचं प्रनूतनकडून आत्तापासून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा असणार आहे. याचे एक कारण म्हणजे, तिला आवडो, ना आवडो तिची आजी नूतनसोबत तुलना होणार आहे. 

नूतन या आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. प्रनूतनच्या नावातचं नूतन असल्याने साहजिकचं तिच्याकडून लोकांच्या भरपूर अपेक्षा राहणार आहेत. याशिवाय सध्याची लोकप्रीय अभिनेत्री काजोलसोबतही अप्रत्यक्षपणे तिची तुलना होणार आहे.

 आपण सगळेच जाणतो की, काजोलची आई तनुजा आणि नूतन दोघी बहीणी आहेत. या नात्याने काजोल आणि मोहनीश बहल मावस भाऊ-बहीण आहेत आणि याच नात्याने प्रनूतनही काजोलची भाची आहे. 

या कसोटीवर प्रनूतन किती यशस्वी ठरते, ते बघूच. २५ वर्षांच्या प्रनूतनने मुंबई विद्यापीठातून बीएलएस एलएलबीची पदवी घेतली आहे़ तिला नृत्याचीही आवड आहे.

मोहनीश बहल आणि सलमान या दोघांमधलं मैत्रीचं नातं खूपच जुनं आहे. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है यासांरख्या चित्रपटात सलमान आणि मोहनीशने एकत्र काम केले आहे. हम आपके है कौन, हम साथ साथ है या दोन्ही चित्रपटांत मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. 

Web Title: salman khan launching mohnish bahl daughter pranutan grand daughter of nutan and niece of kajol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.