ठळक मुद्दे‘भारत’मध्ये सलमान, कतरीना, जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय सुनील ग्रोव्हर, दिशा पाटनी, नोरा फतेही, तब्बू असे अनेक दमदार कलाकार आहेत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांत झळकणार आहेत. साहजिकच भाईजानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. ‘भारत’च्या सेटवरचे हे फोटो पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढणार आहे.‘भारत’मध्ये सलमानसोबत कतरीना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.‘भारत’मध्ये सलमान भारत नावाच्याच तरूणाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्याच्या आयुष्याची अख्खी कथा यात दिसणार आहे.अली अब्बास जफरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात फाळणीच्या वेळची कथा पाहायला मिळणार आहे.सर्कसमध्ये काम केल्यानंतर भारत नवी नोकरी शोधतो. यादरम्यान कतरीना अर्थात कुमूद रैनासोबत त्याची भेट होते आणि दोघांची लव्हस्टोरी सुरु होते.


या चित्रपटाचे शूटींग माल्टा आणि अबूधाबी येथे झाले आहे. अली अब्बास जफरने याठिकाणचे अनेक फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.जॅकी श्रॉफही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. फाळणीच्या वेळचे दृश्य शूट करताना मेकर्सला किती मेहनत करावी लागली, याचा हा पुरावा म्हणता येईल.हा रेल्वे स्थानकावरचा सीन आहे. शेकडो लोक ट्रेनवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. जॅकी श्रॉफही दोऱ्याच्या मदतीने ट्रेनवर चढताना दिसत आहेत.‘भारत’मध्ये सलमान, कतरीना, जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय सुनील ग्रोव्हर, दिशा पाटनी, नोरा फतेही, तब्बू असे अनेक दमदार कलाकार आहेत.


Web Title: salman khan katrina kaif starrer bharat shoot life in pics
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.