salman khan inshallah plot based on his 90s film jaanam samjha karo |   सलमानच्याच ‘या’ चित्रपटाशी मिळतीजुळती आहे ‘इंशाअल्लाह’ची कथा!!
  सलमानच्याच ‘या’ चित्रपटाशी मिळतीजुळती आहे ‘इंशाअल्लाह’ची कथा!!

ठळक मुद्दे ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात सलमान एक ४० वर्षांच्या बिझनेसमॅनची भूमिका साकारणार अशीही चर्चा आहे.

संजय लीला भन्साळींनी ‘इंशाअल्लाह’ची घोषणा केली आणि या चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली. या चित्रपटात सलमान खान आणि आलिया भटची जोडी दिसणार, हे कन्फर्म झाल्यावर तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. आता ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ती म्हणजे, या चित्रपटाचा प्लॉट.
होय, चर्चा खरी मानाल तर ‘इंशाअल्लाह’चे कथानक सलमानच्याच एका चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचे नाव आहे, जानम समझा करो.

‘जानम समझा करो’ या चित्रपटात सलमान खान आणि उर्मिला मातोंडकर लीड भूमिकेत होते. सलमान उर्मिलाला त्याच्या आजोबासमोर प्रेमाचे नाटक करायला सांगतो आणि प्रेमाचे नाटक करता करता दोघेही खरोखर प्रेमात पडतात, असे या चित्रपटाचे कथानक होते. भन्साळींच्या  ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटातही याच कथानकाशी मिळतीजुळती कथा पाहायला मिळणार असल्याचे मानले जातेय. अर्थात या चर्चेत किती तथ्य आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार.

‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात सलमान एक ४० वर्षांच्या बिझनेसमॅनची भूमिका साकारणार अशीही चर्चा आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान यात एका श्रीमंत उद्योगपतीचा एकुलत्या एका मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अतिशय बेजबाबदार आणि  बेपर्वा वृत्तीच्या आपल्या या मुलाला घेऊन त्याचे वडील चिंतीत असतात. अशात ते त्याला लग्न करण्यासाठी बजावतात. आलिया यात २०-२२ वर्षांच्या तरूणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. अ‍ॅक्ट्रेस बनण्याची इच्छा असलेल्या आलियाला सलमान आपल्या वडिलांसमोर प्रेमाचे नाटक करण्याची ऑफर देतो. पण हे नाटक करता करता, दोघेही नकळत प्रेमात पडतात,असा याचा प्लॉट आहे.


Web Title: salman khan inshallah plot based on his 90s film jaanam samjha karo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.