Throwback: सलमानने चक्क केली होती या अभिनेत्रीला साडी नेसवण्यास मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:30 AM2019-12-28T06:30:00+5:302019-12-28T06:30:01+5:30

बिग बॉस या कार्यक्रमाचा 13 वा सिझन सध्या सुरू असून या कार्यक्रमाच्या एका सिझनमध्ये आपल्याला सनी लियोनीला पाहायला मिळाले होते.

salman khan helped sunny leone in draping saree | Throwback: सलमानने चक्क केली होती या अभिनेत्रीला साडी नेसवण्यास मदत

Throwback: सलमानने चक्क केली होती या अभिनेत्रीला साडी नेसवण्यास मदत

googlenewsNext
ठळक मुद्देसलमानने सनी लियोनीला तर चक्क साडी नेसवण्यासाठी मदत केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 2014 मधील असून गिल्ड पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान हा काढण्यात आलेला होता.

सलमान खानच्या दबंग 3 या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी या चित्रपटाच्या टीमने सोडली नाही. या चित्रपटात सलमानसोबतच सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. 

पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला नाही. या चित्रपटाविषयी संमिश्र प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केल्या जात आहे. सामान्य लोकांनाच सोडा पण सलमानच्या फॅन्सना देखील सलमानचा हा चित्रपट तितकासा भावलेला नाहीये. पण असे असले तरी या चित्रपटाने आतापर्यंत 80 कोटीहून अधिक गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे.

सलमानच्या दबंग 3 इतकीच त्याच्या बिग बॉस या कार्यक्रमाची देखील चर्चा आहे. या कार्यक्रमाचा 13 वा सिझन सध्या सुरू असून या कार्यक्रमाच्या एका सिझनमध्ये आपल्याला सनी लियोनीला पाहायला मिळाले होते. सलमान खानने आजवर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना लाँच केले आहे. सलमान अनेक अभिनेत्रींच्या मदतीला धावून आला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमानने सनी लियोनीला तर चक्क साडी नेसवण्यासाठी मदत केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 2014 मधील असून गिल्ड पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान हा काढण्यात आलेला होता. या पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान सलमान सनीला साडी कशी नेसवायची हे स्टेजवर शिकवताना दिसला होता. त्यावेळी सनी म्हणाली होती की, या क्षणामुळे माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. 

Web Title: salman khan helped sunny leone in draping saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.