​या अभिनेत्यामुळे सलमान खान चिडला सुशांत सिंग रजपूतवर... सुशांतला बोलला तू राहा या अभिनेत्यापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 07:42 AM2017-12-11T07:42:16+5:302017-12-11T13:12:16+5:30

सलमान खानच्या हिरो या चिपटापासून सुरज पांचोलीने त्याच्या करियरला सुरुवात केली. हिरो या चित्रपटाच्या त्याच्या भूमिकेला तितकीशी पसंती मिळाली ...

Salman khan gets angry at Sushant Singh Rajput ... | ​या अभिनेत्यामुळे सलमान खान चिडला सुशांत सिंग रजपूतवर... सुशांतला बोलला तू राहा या अभिनेत्यापासून दूर

​या अभिनेत्यामुळे सलमान खान चिडला सुशांत सिंग रजपूतवर... सुशांतला बोलला तू राहा या अभिनेत्यापासून दूर

googlenewsNext
मान खानच्या हिरो या चिपटापासून सुरज पांचोलीने त्याच्या करियरला सुरुवात केली. हिरो या चित्रपटाच्या त्याच्या भूमिकेला तितकीशी पसंती मिळाली नव्हती. खऱ्या आयुष्यात सुरज आणि सलमान खान यांचे नाते खूपच चांगले आहे. आदित्य पांचोली आणि सलमान खान यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यामुळे सलमानने आपल्या मित्राच्या मुलाला आपल्या बॅनर अंतर्गत लाँच केले. भविष्यात देखील सुरजला बॉलिवूडमध्ये सेटल करण्यासाठी सलमान मदत करणार आहे. 

sooraj pancholi

सलमानचे विवेक ऑबेरॉय, रणबीर कपूर यांच्यासोबत असलेली भांडणं तर आपल्याला माहीत आहेत. पण आता सलमान आणि सुशांत सिंग रजपूत यांच्यात देखील मतभेद निर्माण झाले आहेत आणि यासाठी सुरज पांचोली जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. सुरजवरून सुशांत सिंगला सलमानने चांगलेच फटकारले आहे. नुकतेच सुरज आणि सुशांत एकाच पार्टीत उपस्थित होते. या पार्टीत सुशांत सुरजसोबत खूप वाईट वागला असल्याचे म्हटले जात होते. ही गोष्ट सलमान खानला कळताच सलमानने त्याच्या मॅनेजरला सुशांतला फोन करायला सांगितला आणि त्याच्या मॅनेजरने सुशांतला निरोप दिला की, सलमानने त्याला ताबडतोप भेटायला बोलावले आहे. सुशांत सलमानला भेटायला गेला असता त्याने सुशांतला चांगलेच सुनावले. एवढेच नव्हे तर सुरजपासून दूर राहाण्याचा सलमानने सुशांतला सल्ला दिला. सलमान खानचा हा रौद्र अवतार पाहून सुशांतचा चेहरा चांगलाच पडला होता. त्याने लगेचच सलमान खानची माफी मागितली. 

sushant singh rajput


सलमान आणि सुशांतमध्ये असलेले हे मतभेद काही नवीन नाहीत. करण जोहर आणि सलमान मिळून ड्राइव्ह या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटासाठी नायिका म्हणून जॅकलिनची निवड करण्यात आली होती. पण या चित्रपटात सुशांत सिंग नायक म्हणून आहे हे सलमानला कळल्यावर सलमान या प्रोजेक्टमधून बाहेर पडला अशी देखील चर्चा आहे. 
सुरज पांचोली सध्या बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तर सुशांतने काय पो छे, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे आजवर अनेक चित्रपट गाजले आहेत. 

Also Read : अंकिता लोखंडेमुळे गमवावा लागला सुशांत सिंग रजपुतला हा अॅवॉर्ड

Web Title: Salman khan gets angry at Sushant Singh Rajput ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.