salman khan film bharat trailer but tabu not appears know real reason | ‘भारत’च्या ट्रेलरमध्ये का दिसली नाही तब्बू? जाणून घ्या कारण
‘भारत’च्या ट्रेलरमध्ये का दिसली नाही तब्बू? जाणून घ्या कारण

ठळक मुद्देतब्बू ही सलमान खान आणि खान कुटुंबाच्या अतिशय जवळ आहे. सलमानसोबत तिने अनेक चित्रपटांत काम केले.

सलमान खानच्या ‘भारत’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये सलमान खान, कतरीना कैफ, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर, सोनाली कुलकर्णी अशा सगळ्यांची झलक पाहायला मिळाली. फक्त संपूर्ण ट्रेलरमध्ये दिसला नाही तो केवळ एक चेहरा. तो म्हणजे, अभिनेत्री तब्बूचा. असे का? तर यामागे एक खास कारण असल्याचे कळतेय.
होय,‘भारत’च्या स्टारकास्टची घोषणा झाली होती, तेव्हा ती या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे सांगितले गेले होते. पण ट्रेलरमध्ये तब्बू कुठेच नाही म्हटल्यावर ती कुठे गायब आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला. पण घाबरायचे कारण नाही. तब्बू या चित्रपटात आहे आणि एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. याऊपरही ट्रेलरमध्ये ती नाही, यामागे कारण आहे, चित्रपटाचा क्लायमॅक्स. होय, तब्बूची भूमिका ‘भारत’च्या क्लायमॅक्सशी जुळलेली आहे. हेच कारण आहे की, ना तब्बू ट्रेलरमध्ये दिसली, ना तिचे लूक पोस्टर जारी केले गेले. तब्बूच्या भूमिकेचा खुलासा करणे म्हणजे, ‘भारत’च्या क्लायमॅक्सचा खुलासा करण्यासारखे होते. त्यामुळे तिची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.


तब्बू ही सलमान खान आणि खान कुटुंबाच्या अतिशय जवळ आहे. सलमानसोबत तिने अनेक चित्रपटांत काम केले. यापूर्वी ती ‘अंधाधुन’मध्ये दिसली होती.
‘भारत’च्या ट्रेलरबद्दल सांगायचे तर, या ट्रेलरची सुरुवात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या संवादाने होते. ट्रेलरमध्ये ड्रामा आहे, अ‍ॅक्शन आहे, सलमान व कॅटचा रोमान्सही आहे. या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणर असून येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


Web Title: salman khan film bharat trailer but tabu not appears know real reason
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.