‘या’ अभिनेत्याने सलमान खानशी घेतला पंगा, पुन्हा कतरीना ठरली कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 10:41 AM2020-03-05T10:41:33+5:302020-03-05T10:42:13+5:30

होय, बॉलिवूडचा आणखी एका अभिनेता सलमानच्या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये गेला आहे

salman khan do not like vicky kaushal due to katrina kaif-ram | ‘या’ अभिनेत्याने सलमान खानशी घेतला पंगा, पुन्हा कतरीना ठरली कारण 

‘या’ अभिनेत्याने सलमान खानशी घेतला पंगा, पुन्हा कतरीना ठरली कारण 

googlenewsNext
ठळक मुद्दे विकी व कतरीना काही दिवसांपूर्वी एकत्र सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले होते.

सलमान खान मित्रांवर जीव ओवाळून टाकतो. पण एखाद्याशी बिनसले की, भाईजान त्याला परत कधीच माफ करत नाही. बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्याकडे सलमान ढुंकूनही पाहत नाही. आता सलमानच्या या यादीत आणखी एक असेच नाव चढले आहे. होय, बॉलिवूडचा आणखी एका अभिनेता सलमानच्या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये गेला आहे. विशेष म्हणजे, याला पुन्हा एकदा कारण ठरलीय ती कतरीना कैफ .
सलमानचे कुणासोबत वाजले, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्याचे नाव आहे, विकी कौशल. होय, विकी कौशलने जाणता अजाणता सलमानशी पंगा घेतला. त्याचा गुन्हा काय तर कतरीनाशी मैत्री.

विकी कौशल आणि कतरीना कैफ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसापासून सुरु आहेत. अद्याप विकी व कतरीनाने आपले नाते जगापुढे उघड केलेले नाही. पण हो, यामुळे सलमान मात्र बिथरलाय.

काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये विकी कौशलने  मस्तीमस्तीत अप्रत्यक्षपणे का होईना कतरिनावरचे त्याचे प्रेम बोलून दाखवले होते. या इव्हेंटमध्ये सलमान खानही हजर होता. पहिल्या रांगेत बसून सलमान  हसत हसत या सर्व गोष्टी पहात होता. कतरीना कधीकाळी सलमानच्या जवळ होती. पण आधी रणबीर कपूरने कतरीना सलमानपासून हिरावले आणि आता विकी कौशल कतरीनाला हिरावू पाहतोय. याचमुळे भाईजान बिथरल्याचे कळतेय. कतरीना व विकी कौशलबद्दल एक शब्द जरी ऐकला तरी भाईजान आतून दुखावतो. गेल्या अनेक महिन्यांपासून कतरीना व विकीची वाढती जवळीक सलमान पाहतोय. याचमुळे सलमानने विकीला आपल्या गुड बुकमधून बाहेर फेकल्याची चर्चा आहे.

 विकी व कतरीना काही दिवसांपूर्वी एकत्र सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले होते. दिवाळी पार्टीतही दोघे मीडियासोबत लपाछपी करताना दिसले होते.  

Web Title: salman khan do not like vicky kaushal due to katrina kaif-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.