सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'भारत'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय. चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे सलमान खुप खूश आहे. नुकतंच सलमानने सांगितले की एक अभिनेत्रीसमोर तो ढसाढसा रडला.  


सलमान खान भारतमधील त्याची सहकलाकार अभिनेत्री तब्बूसमोर खूप रडला होता. सलमान खानने सांगितलं की, भारतमध्ये एक खूप इमोशनल सीन होता, जो तब्बूसोबत चित्रीत केला जाणार होता. यावेळी सलमान ग्लिसरीन न लावताच रडू लागला होता. रडत रडतच तो डायलॉग म्हणाला होता की, कोई भी चीजें ठीक की जा सकती हैं बातचीत से...'


याशिवाय सलमान म्हणतो की, मला वाटतं की आजपर्यंत जेवढ्या पण लोकांसोबत काम केलं त्यात सुनील ग्रोव्हर सर्वात जास्त टॅलेंटेड आहे. तो जेव्हा कॅरेक्टरमध्ये असतो तेव्हा तो कोणाची मिमिक्री करत नाही किंवा कॉमेडी करत नाही. तो खूप सीरियस राहतो तरीदेखील लोकांना हसू येते. 


भारतच्या यशाबद्दल सलमान म्हणाला की, मी खूप खूश आहे भारतला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सगळ्यांच्या कामाचे खूप कौतूक होतंय. मी इतके प्रमोशन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कधीच केले नव्हते जितके आता करतोय. ज्या लोकांना माझा चित्रपट आवडतोय त्यांचा मी खूप आभारी आहे.


भारतचे कलेक्शनबद्दल सांगायचं तर सात दिवसांत १५० कोटी रुपये कमवते. हा कोरियन चित्रपट ओड टू माय फादरचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे.

सलमान खानसोबत कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोव्हर, दिशा पटानी, नोरा फतेही आणि असिफ शेख प्रमुख भूमिकेत होते.


Web Title: Salman Khan cried on Tabbu, he told reason of incident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.