‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ने शेअर केला डान्स व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, डॉक्टरांना भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:16 PM2021-09-27T12:16:46+5:302021-09-27T12:19:58+5:30

Harshaali Malhotra : हर्षालीचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात. पण अलीकडे तिचा एक व्हिडीओ पाहिला आणि अनेकांनी हर्षालीला ट्रोल करणे सुरू केले.

Salman Khan Co Star And Bajrangi Bhaijaan Fame Harshaali Malhotra Dance On Pa Que Se Lo Gozen But Trolled On Social Media | ‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ने शेअर केला डान्स व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, डॉक्टरांना भेट

‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ने शेअर केला डान्स व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, डॉक्टरांना भेट

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगदरम्यान हर्षाली सतत रडायची. सलमानचा फायटिंग सीन वा इमोशनल सीन पाहिला की ती रडू लागायची.

‘बजरंगी भाईजान’ ( Bajrangi Bhaijaan ) या चित्रपटाचे नाव घेतले तरी एक चेहरा हमखास आठवतो. तो म्हणजे, चिमुकल्या मुन्नीचा.  मुन्नीची भूमिका साकारली होती हर्षाली मल्होत्राने (Harshaali Malhotra). सिनेमात तिच्या वाट्याला एकही डायलॉग नसला तरी तिचा रुपेरी पडद्यावरील अंदाज पाहून सा-यांनीच तिचे कौतुक केले होते. हा सिनेमा केला तेव्हा मुन्नी फक्त सात वर्षांची होती. आता ती मोठी होतेय त्याच बरोबर ती ग्लॅमरसही दिसू लागली आहे. 
हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ व फोटो ती शेअर करत असते. खरे तर हर्षालीचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात. पण नुकताच हर्षालीने तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या डान्स व्हिडीओमध्ये ती Pa Que Se Lo Gozen या गाण्यावर थिरकताना दिसतेय. 56 हजारांवर लोकांनी या व्हिडीओला लाइक्स केले आहे. पण यावरच्या काही कमेंट्सची मात्र लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ये क्या कर रही हो मुन्नी, अशी कमेंट एका युजरने केली आहे. मुन्नी बदनाम हो गई, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. ‘कधी कधी जास्तचं वेडी होतेस. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घे,’अशी कमेंट एका युजरने केली आहे.

याआधीही हर्षाली अशीच ट्रोल झाली होती. एका व्हिडीओत हषार्ली तिच्या काल्पनिक बॉयफ्रेन्डसोबत बोलताना दिसली होती, काही लोकांना हा व्हिडीओ आवडला होता. पण अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हषार्लीला तिच्या वयाची आठवण करून दिली होती.

 तुझे वय काय आहे?, असा सवाल एका युजरने हा व्हिडीओ पाहून केला. अन्य एकाने अभ्यासात लक्ष घाल, इतक्या लवकरच बॉयफ्रेन्डच्या नादाला लागू नकोस, असा सल्ला दिला होता. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.
‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगदरम्यान हर्षाली सतत रडायची. सलमानचा फायटिंग सीन वा इमोशनल सीन पाहिला की ती रडू लागायची. इतकेच नाही तर सलमान खानसोबत बोलतानाही ती प्रचंड लाजायची. पण हळूहळू दोघांतही चांगली मैत्री झाली होती. ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा करण्याआधी हर्षालीने कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title: Salman Khan Co Star And Bajrangi Bhaijaan Fame Harshaali Malhotra Dance On Pa Que Se Lo Gozen But Trolled On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.