salman khan chewing the greens video salman khan breakfast with his love amid quarantine at panvel farmhouse-ram | WHAT? लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सलमान खानवर आली घोड्याचा चारा खाण्याची वेळ?

WHAT? लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सलमान खानवर आली घोड्याचा चारा खाण्याची वेळ?

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे सलमान पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये आहे तर वडील मुंबईतल्या घरात राहत आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन पुकारण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये सगळे लोक आपआपल्या घरात अडकून पडलेत. अगदी सामान्यांपासून तर सेलिब्रिटींपर्यंत सगळेच. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानही लॉकडाऊनमुळे पनवेलच्या फार्महाऊसमध्ये अडकून पडला आहे. कुटुंबसोडून सध्या सलमान फार्म हाऊसवर दिवस घालवतोय. अशात फार्म हाऊसवरचा त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. होय, या व्हिडीओत सलमान त्याच्या आवडत्या घोड्याला चारा भरवताना दिसतोय. पण हे काय? घोड्याला चारा भरवता भरवता सलमानही घोड्याचा चारा खाताना दिसतोय.


‘माझ्या प्रेमासोबत न्याहारी...,’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
तूर्तास सलमानच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

घाबरलाय सलमान

लॉकडाऊनमुळे सलमान पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये आहे तर वडील मुंबईतल्या घरात राहत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून वडिलांची भेट न झाल्याने सलमानला त्यांची चिंता सतावत आहे. अलीकडे वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या सलमानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘मी तर घाबरलोय’असे सलमान या व्हिडीओत म्हणताना दिसला होता.
‘आम्ही सर्व तर घाबरलोय. गेल्या तीन आठवड्यांपासून मी माझ्या वडिलांना भेटलो नाही. निर्वाणसुद्धा (सोहेल खानचा मुलगा) त्याच्या वडिलांना भेटला नाही. जो डर गया वो मर गया असे म्हटले जातेय. पण जो डर गया वो बच गया अशी परिस्थिती सध्या आहे. आम्ही घाबरलोय हे बिनधास्त सांगतोय. कारण त्याशिवाय आता काही पर्याय नाही, असे सलमान  या व्हिडीओ म्हणताना दिसला होता.

Web Title: salman khan chewing the greens video salman khan breakfast with his love amid quarantine at panvel farmhouse-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.