VIDEO : सलमान खानने रुमर्ड GF युलिया वंतूर आणि Ex गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसोबत केली NEW YEAR पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 05:28 PM2022-01-01T17:28:11+5:302022-01-01T17:34:44+5:30

सलमान खानने (Salman khan )ही त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड युलिया वंतूर आणि कुटुंबासोबत नवीन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले.

Salman khan celebrates new year with iulia vantur sangeeta bijlani bina kak shares photo with actor | VIDEO : सलमान खानने रुमर्ड GF युलिया वंतूर आणि Ex गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसोबत केली NEW YEAR पार्टी

VIDEO : सलमान खानने रुमर्ड GF युलिया वंतूर आणि Ex गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसोबत केली NEW YEAR पार्टी

googlenewsNext

नव वर्ष 2022 सुरू झाले आहे. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी नववर्षाचे स्वागत केले आहे. सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींसोबत फोटो शेअर करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने (Salman khan )ही त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड युलिया वंतूर (Iulia Vantur) आणि कुटुंबासोबत नवीन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले. विशेष म्हणजे या सेलिब्रेशनमध्ये सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) ही दिसली. 

अभिनेता आणि राजकारणी बिना काक यांनी सलमान खानसोबतच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बीना काकसोबत सलमान खान देखील आहे, त्याने ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड जॅकेट आणि ब्लॅक टी-शर्ट घातलेला आहे.तर बीना काक यांनी मखमली कुर्ती परिधान केली आहे. याशिवाय युलिया वंतूरने इन्स्टाग्रामवर नवीन वर्षाचे स्वागत करणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान दिसत नाहीये. पण, संगीता बिजलानीच्या उपस्थितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचवेळी बीना काक देखील या व्हिडिओचा एक भाग आहेत..


या व्हिडिओवर कमेंट करताना,यूजर्स अभिनेत्रीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत आणि संगीता बिजलानीच्या उपस्थितीवर प्रतिक्रिया देखील देत आहेत. सोबतच सलमान अखेर कुठे आहे असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. अनेकांनी युलिया वंतूरला सलमान खानबद्दल प्रश्न विचारले आहेत.

 सलमान खानने त्याच्या पनवेल फार्महाऊसवर कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ चर्चेत होते. या अभिनेत्याने 27 डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला, ज्याच्या व्हिडिओ आणि फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले.
 

Web Title: Salman khan celebrates new year with iulia vantur sangeeta bijlani bina kak shares photo with actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.