Salman khan and alia bhatt inshallah to be shot in usa | सलमान आलियाच्या इंशाअल्लाहचे शूटिंग होणार 'या' सुंदर देशात
सलमान आलियाच्या इंशाअल्लाहचे शूटिंग होणार 'या' सुंदर देशात

ठळक मुद्दे सध्या ते या सिनेमाच्या तयारी लागला आहे

संजय लीला भन्साळी यांचा 'इंशाअल्लाह' सिनेमाची घोषणा झाल्यापासून अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सलमान खानसोबत पहिल्यांदा आलिया भट स्क्रिन पहिल्यांदा शेअर करणार आहे. सध्या ते या सिनेमाच्या तयारी लागला आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सिनेमाची टीम पुढच्या 3 आठवड्यामध्ये लोकेशन शोधायला सुरुवात करणार आहे.लोकेशन अमेरिकेतील फ्लॉरिडामध्ये असेल.      

   
 भन्साळींच्या या सिनेमात सलमान खान चाळीशीच्या एका उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे. तर आलिया त्याच्यापेक्षा अर्धा वयाच्या एका तरूण अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. म्हणजेच, चित्रपटात वेगवेगळ्या जनरेशनची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भन्साळींनी आपल्या या सिनेमासाठी जाणीवपूर्वक सलमान व आलियाची निवड केली, हे स्पष्ट आहे. भन्साळींच्या टीम शूटिंगसाठी वाराणसी आणि हरिद्वारला जाऊन आली आहे. जवळपास 2 वर्ष भन्साळी या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत होते.

 दोघांचे चाहते सलमान व आलिया या दोघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ऐवढेच नाही तर आलिया या सिनेमासाठी वजन वाढणार असल्याचे समजतेय. रिपोर्टनुसार, सलमान खानने संजय लीला भन्साळीला सांगितले की, आलिया माझ्यासमोर खूपच बारीक वाटेल. अशात मी वजन वाढवू शकत नाही. अशात आलियाने वजन वाढवावे असे मला वाटते. संजय लीला भन्साळी व सलमान खान तब्बल वीस वर्षानंतर एकत्र काम करणार आहे. यापूर्वी त्या दोघांनी हम दिल दे चुके सनममध्ये एकत्र काम केले होते.


Web Title: Salman khan and alia bhatt inshallah to be shot in usa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.