बाहुबली फेम अभिनेत्री नोरा फतेही नेहमी आपल्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत असते. नोरा एक चांगली डान्सर आहे आणि ती नेहमी तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. प्रेक्षकदेखील तिच्या डान्सचे चाहते आहेत. नुकताच नोरा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 


नोराचा सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात नोरा बँकॉकच्या लोकल मार्केटमध्ये कपडे विकताना दिसते आहे. या व्हिडिओमध्ये नोरा जमिनीवर बसली आहे आणि लोकांना कपडे दाखवते आहे. या दरम्यान तिने पीच रंगाचा टीशर्ट व शॉर्ट्स परिधान केले आहेत. तिच्या आजूबाजूला कपड्यांचा ढीग पहायला मिळतो आहे.


नोरा ग्राहकांना कपडे दाखवून त्याचे भाव सांगत आहेत. त्यातही खास बाब ही आहे की नोरा तिथल्या स्थानिक भाषेत ग्राहकांसोबत चर्चा करते आहे. नोरा सेल्समनच्या अंदाजात देखील सुंदर दिसते आहे. तिचे चाहते तिच्या या व्हिडिओला खूप चांगली पसंती दर्शवत आहेत. तर काही लोक हा व्हिडिओ पाहून खूप चकीत होत आहेत की नोरा परदेशात काय करत आहे.


नुकतीच नोरा फतेहीसलमान खानच्या भारत चित्रपटात झळकली. या चित्रपटात तिने लॅटीन अमेरिकन मुलीची भूमिका साकारली होती. नोराने या चित्रपटासाठी माल्टामध्ये शूटिंग केले. या भूमिकेसाठी नोराने अमेरिकन भाषेचे प्रशिक्षण घेतले.

नोरा यापूर्वी दिलबर दिलबर या गाण्यामुळे चर्चेत आली होती. तिचे हे गाणे चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. या गाण्याला युट्यूबवर १२ कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

नोरा स्ट्रीट डान्सर थ्रीडी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २४ जानेवारी, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.


Web Title: salman-khan-actress-selling-clothers-in-bangkok-local-market, Video viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.