बॉलिवूडचा दबंग खान सलमान व अभिनेत्री भाग्यश्री यांनी 'मैंने प्यार किया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. सलमान व भाग्यश्रीनं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटामुळे त्या दोघांच्या करियरला खरी दिशा मिळाली होती. पुन्हा एकदा भाग्यश्री चर्चेत आली आहे. पण यावेळेस चित्रपट किंवा प्रोजेक्टमुळे ती चर्चेत आलेली नाही. तर फिटनेस व एक्सरसाइजमुळे ती चर्चेत आली आहे.


अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रीय असून सध्या ती तिचे एक्सरसाइज करतानाचे फोटो व व्हिडिओ पोस्ट करताना दिसते. आता भाग्यश्री पन्नास वर्षांची झाली असली तरी या वयात तिचे फिटनेस पाहून थक्क व्हायला होतं. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भाग्यश्री बोसू बॉलवर बॅलन्स करताना दिसतेय. त्यासोबतच पाच किलोचा डंबल उचलले आहेत. तिच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


अभिनेत्री भाग्यश्रीने आपल्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनपासून केली होती.

तिच्या पहिल्या मालिकेचं नाव होतं कच्ची धूप. ही मालिका १९८७ साली प्रसारीत झाली होती.

मात्र तिला खरी ओळख सलमान खानसोबतचा 'मैंने प्यार किया' चित्रपटातून मिळाली होती.


Web Title: Salman Khan actress Bhagyashree video know all about Maine Pyar Kiya Heroine
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.