का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 03:30 PM2019-08-27T15:30:59+5:302019-08-27T15:32:43+5:30

‘मैनें प्यार किया’ सुपरडुपर हिट झाला आणि लोकांनी सलमानला डोक्यावर घेतले. याच सलमानचा एक 30 वर्षे जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

salman khan 30 year old video of screen test for maine pyar kiya going viral | का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ?

का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ?

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या सलमान ‘दबंग 3’च्या शूटींगमध्ये बिझी आहे.

सलमान खानने 1988 मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘बीवी हो तो ऐसी’ हा त्याचा पहिला सिनेमा. पण त्याचा हा पहिलाच सिनेमा सुपरडुपर फ्लॉप झाला. यानंतर पुढच्या वर्षी सलमानचे नशीब फळफळले आणि त्याला ‘मैनें प्यार किया’ हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि लोकांनी सलमानला डोक्यावर घेतले. याच चित्रपटाचा सलमानचा एक 30 वर्षे जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, हा व्हिडीओ आहे,‘मैनें प्यार किया’च्या स्क्रिन टेस्टचा.
30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटात सलमान रोमॅन्टिक रोलमध्ये दिसला होता. अभिनेत्री भाग्यश्री त्याच्या अपोझिट होती. या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले आणि सलमानच्या करिअरची गाडी चालू लागली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत सलमानने ब्ल्यू कलरचा टी-शर्ट घातलेला आहे. त्याच्या हातात गिटार आहे. गुलाबाचे फुल घेऊन तो रोमॅन्टिक डायलॉग बोलताना दिसतोय.




त्याकाळात सलमान आजच्या सारखा सुपरस्टार नव्हता. तो दिसायचा तो बहुतेक जाहिरातींमध्ये. ‘लखानी’ची त्याची जाहिरात पाहून सूरज बडजात्या यांनी त्याला ‘मैनें प्यार किया’च्या स्क्रिन टेस्टसाठी बोलवले होते. या चित्रपटासाठी भाग्यश्रीला १ लाख रूपये तर सलमानला केवळ 30 हजार रूपये मानधन मिळाले होते, असे म्हटले जाते.


सध्या सलमान ‘दबंग 3’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. ‘दबंग’ फ्रेन्चाइजीचा हा तिसरा चित्रपट दमदार बनवण्यासाठी सलमान दिवसरात्र एक करतोय. चुलबुल पांडेचे पात्र साकारण्यासाठी सलमानने वजनही कमी केले आहे.

Web Title: salman khan 30 year old video of screen test for maine pyar kiya going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.