सैफ अली खाननं केला 'सेक्रेड गेम्स २'बद्दल खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 05:40 PM2019-07-23T17:40:22+5:302019-07-23T17:42:26+5:30

सेक्रेड गेम्स २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Saif Ali Khan told story of 'Sacred Games 2' | सैफ अली खाननं केला 'सेक्रेड गेम्स २'बद्दल खुलासा

सैफ अली खाननं केला 'सेक्रेड गेम्स २'बद्दल खुलासा

googlenewsNext

सेक्रेड गेम्स या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला व या सीरिजमधील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केलं. त्यानंतर नुकतीच या सीरिजच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरा सीझन १५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या सीझनबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. नुकतेच या सीझन २मधील कलाकारांचा रेट्रो लूक प्रदर्शित करण्यात आला. सेक्रेडमध्ये सरताज सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत या सीरिजच्या कथेविषयी खुलासा केला आहे. 


अमर उजालाच्या रिपोर्टनुसार सैफ अली खाननं सेक्रेड गेम्सबद्दल सांगितलं की, मी नेटफ्लिक्सवरील बरेच शोज पाहिले आहेत आणि मला ते आवडलेदेखील. हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे. इथे मीसुद्धा निर्माता होऊ शकतो असा विचार सुरू असतानाच मला सेक्रेड गेम्सची ऑफर आली आणि मी जराही विचार न करता होकार दिला.


दुसऱ्या सीझनमध्ये सरताज सिंगच्या भूमिकेबद्दल त्याने सांगितले की, ‘या सीझनमध्ये सरताज पहिल्यापेक्षा अधिक फिट आणि गतिशील दिसणार आहे. यामध्ये जास्त अॅक्शन पाहायला मिळेल. सरताजच्या पत्नीसोबत सुरू असलेल्या वादावरसुद्धा लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्याचसोबत त्याच्या वडिलांविषयीही दाखवण्यात येणार आहे.


या मुलाखतीत सैफने वेब सीरिजच्या सेन्सॉरशिपबद्दलही त्याचं मत मांडलं. ‘सेक्रेड गेम्समध्ये माझ्या भूमिकेला फार शिव्या नाहीत. कथेची गरज असल्याने असे संवाद लिहिले जातात. चित्रपटांमध्ये फार बंधने असतात. माझ्या मते इथे प्रेक्षकांसमोर सत्य दाखवलं जातं.

‘एलओसी’मध्ये जेव्हा मी पाकिस्तानी सैन्याला पाहतो तेव्हा शिव्या देणारे एक-दोन संवाद होते. सेन्सॉरशिपमुळे त्या संवादावर कात्री लागली. वेब सीरिजमध्ये असं होत नाही. खऱ्या आयुष्यात जे जसं असतं ते तसंच दाखवलं जातं. खऱ्या आयुष्यात राग आल्यास आपण अपशब्द वापरतोच ना.

Web Title: Saif Ali Khan told story of 'Sacred Games 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.