सेलिब्रेटींबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच क्रेझ पहायला मिळते. त्यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफ जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर दुसरीकडे सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या टचमध्ये राहण्यासाठी धडपडत असतात. ते आपले फोटो व व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना अपडेट देत असतात. 


एकीकडे सोशल मीडियामुळे सेलिब्रेटी व चाहत्यांमधील डिस्टेंस कमी झाला आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री करीना कपूर खान व तिचा नवरा सैफ अली खान सोशल मीडियावर सक्रीय नाहीत.

सोशल मीडियावर करीना कपूर आणि सैफ अली खानचे अधिकृत अकाउंटच नाही. पण तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की ऑफिशियल आयडी नसतानाही करीना व सैफ सोशल मीडियावर सक्रीय आहेत. हा खुलासा खुद्द सैफने एका चॅट शोमध्ये केला आहे. 


सैफला करीना आणि तू सोशल मीडियावर सक्रीय नाही आहात, याबद्दल विचारले असता सैफ म्हणाला की, करीना सोशल मीडियावर नाही? मी तर तिला सोशल मीडियावर बऱ्याचजा पाहतो. मला माहित नाही जर तिचे गुप्त अकाउंट असेल. पण ती सोशल मीडियावर आहे. इतकेच नाही तर कित्येक वेळा मी तिचा फोन घेतो. तिच्या सोशल मीडियाबद्दल मला माहित आहे.


तर सैफने याबाबतीत स्वतः बद्दल सांगताना म्हणाला की, सोशल मीडियावर मी सक्रीय आहे पण खऱ्या नावाने नाही. मी माझ्या चित्रपटातील एका पात्राच्या नावाने सोशल मीडियावर आहे. 
सैफने त्याच्या बाजार चित्रपटातील शकुन कोठारी या नावाने सोशल मीडियावर अकाउंट बनवले आहे. तो सांगतो की मला माहित नाही की हे मला कितपत योग्य वाटते. जर मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो तेव्हा मी हा विचार करण्यात वेळ घालवतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करत आहेत. तसेच माझ्या फोटोंबद्दल काय विचार करत असतील याचा विचार करत बसतो. त्यामुळे मला कळत नाही की मी सोशल मीडियावर सक्रीय रहावे की नाही.


सैफ अली खानच्या कामाबद्दल सांगायचे तर सैफ लवकरच तानाजी : द अनसंग वॉरियर अजय देवगण, काजोल, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत झळकणार आहे.


Web Title: saif-ali-khan-reveals-that-he-and-wife-kareena-kapoor-khan-both-are-active-on-social-media-under-pseudo-fake-name
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.