बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आपल्या अभिनयासह आपली यशस्वी कारकिर्द रेखाटत असून तो नुकताच स्टार प्लस वाहिनीवरील ‘कहां हम, कहां तुम’च्या पहिल्या प्रोमोमध्ये पहायला मिळाला. संदिप सिकंद यांचा शो जगातील अशा संकल्पनेबद्दल बोलतो, जिथे प्रेम तर आहे पण प्रेमासाठी वेळ नाही.


एक उत्तम अभिनेता असल्यासोबत सैफ अली खान एक आदर्श कौटुंबिक पुरूष आणि प्रेमळ पितासुद्धा आहे. जेव्हा या मालिकेबद्दल काय आवडले असे त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, “ज्याप्रकारे सोनाक्षी (दिपिका कक्कर) आणि रोहित (करण व्ही ग्रोव्हर) हे आपापल्या आयुष्यात अतिशय बिझी असल्याचे दाखवले आहे आणि एकमेकांसाठी वेळ शोधण्यासाठी ते खूप धडपडतात, ती संकल्पना मला अगदी लगेच आपलीशी वाटली. 


सैफने पुढे सांगितले की, मीही कामात खूपच व्यस्त असलो तरी माझ्या परिवाराला वेळ देणे यालाच मी सर्वोच्च प्राथमिकता देतो. मला ९ ते ९ शूट शिफ्ट्‌स फारशा आवडत नाहीत. कारण त्यात काम नेहमीच उशीरा संपते आणि मला घरी पोहोचायला उशीर होतो. माझ्या पत्नी आणि मुलासोबत जास्त वेळ व्यतीत करणे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

खासकरून माझ्या मुलासोबत. कारण तो आता मोठा होतो आहे. त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय मी झोपूच शकत नाही. माझ्यासाठी माझे कुटुंब सर्वप्रथम असून काहीही झाले तरी त्यांना वेळ देणे माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे.”


सोनाक्षी (दिपिका ककर) आणि रोहित (करण व्ही ग्रोव्हर) हे प्रमुख कलाकार निश्चितपणे सैफ अली खानकडून प्रेरणा घेऊ शकतात आणि आपल्या कामातून आपल्या प्रेमासाठी थोडा वेळ काढू शकतात. ‘कहां हम, कहां तुम’ १७ जूनपासून फक्त स्टार प्लसवर वाहिनीवर पहायला मिळणार आहे. 


Web Title: For Saif Ali Khan, this person is special, says, 'Important to give time to this person'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.