सॅक्रेड गेम्सचे कलाकार ठरले नंबर 1, हे आहे या मागचे कारण !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 07:15 AM2019-09-11T07:15:00+5:302019-09-11T07:15:00+5:30

सॅक्रेड गेम्सचा सीझन 2 मधल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलीय. या वेबसीरिजच्या भूमिका आणि त्यांचे संवादसुध्दा लोकांच्या पसंतीस पडले.

Sacred Games Artists Become Number one in digital media | सॅक्रेड गेम्सचे कलाकार ठरले नंबर 1, हे आहे या मागचे कारण !

सॅक्रेड गेम्सचे कलाकार ठरले नंबर 1, हे आहे या मागचे कारण !

googlenewsNext

सॅक्रेड गेम्सचा सीझन 2 मधल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलीय. या वेबसीरिजच्या भूमिका आणि त्यांचे संवादसुध्दा लोकांच्या पसंतीस पडले. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे ह्या दोन भूमिकांसोबतच सॅक्रेड गेम्सच्या पहिल्या आणि दुस-या पर्वातल्या इतरही भूमिकांना आणि त्या निभावणा-या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

अमेरिका स्थित मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने सॅक्रेड गेम्सच्या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची एक लिस्ट नुकतीच काढली आहे. त्यानुसार, सरताजच्या भूमिकेत दिसलेल्या सैफ अली खानच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सचे दुसरे पर्व रिलीज झाल्यानंतरच्या आठवड्यात (15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट) 78 गुणांवरून 100 गुणांपर्यंत वाढ झालेली दिसून आलीय. ज्यामुळे सैफ अली खान लोकप्रियतेत प्रथम क्रमांकावर आहे. गणेश गायतोंडे बनलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचीही लोकप्रियता 55 गुणांवरून 59 गुणांपर्यंत पोहोचलीय. ज्यामुळे नवाज लोकप्रियतेत दुस-या क्रमांकावर पोहोचलाय.


बात्या एबेलमॅन बनलेली कल्कि कोचलिन लोकप्रियतेत तिस-या स्थानावर आहे. सुरूवातीला 39 गुणांवर असलेली कल्कि लोकप्रियतेत 47 गुणांवर पोहोचली आहे. पूर्व आयएसआय प्रमुख शाहिद खानच्या खतरनाक भूमिकेत अभिनेता रणवीर शौरी होता. त्याच्या ह्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्याने तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.  

 


सीझन 2 मधल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेलियी गुरुजींच्या भूमिकेत दिसलेला  प्रतिभावान अभिनेता पंकज त्रिपाठी पाचव्या स्थानावर आहे. सुरवीन चावला उर्फ जोजो, अमृता सुभाष उर्फ  केडी यादव मॅडम, एलनाज़ नौरोज़ी उर्फ जोया मिर्ज़ा आणि ल्यूक केनी उर्फ मलकोम ह्या कलाकारांनांही सॅक्रेड गेम्सच्या रिलीजनंतर चांगलीच प्रसिध्दी मिळाली.


स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “पहिल्या सहा अभिनेत्यांच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सच्या रिलीजच्या सुमारास चांगलीच वाढ झालेली दिसून आलीय. सॅक्रेड गेम्सच्या पहल्या सिझननंतर दूस-या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात ह्या कलाकारांच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आलीय. सोशल, व्हायरल न्यूज़, डिजिटल न्यूज़ आणि न्यूजपेपर्समध्ये ह्या कलाकारांची चांगलीच फॅन फॉलोविंग दिसून आलीय.”
 

Web Title: Sacred Games Artists Become Number one in digital media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.