या अभिनेत्याने गरिबांना केली मदत, त्याच्या स्टाफने विचारले आमच्या पगाराचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 05:45 PM2020-05-07T17:45:31+5:302020-05-07T17:48:07+5:30

या अभिनेत्याने अनेक महिन्यांपासून त्याच्या कर्मचाऱ्यांचा पगार दिलेला नाहीये.

Sachiin Joshi Backs Rs 3 Crore Donation, Former Employees Claim Non-Payment Of Dues PSC | या अभिनेत्याने गरिबांना केली मदत, त्याच्या स्टाफने विचारले आमच्या पगाराचे काय झाले?

या अभिनेत्याने गरिबांना केली मदत, त्याच्या स्टाफने विचारले आमच्या पगाराचे काय झाले?

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या काही मजूरांना मदत करण्यासाठी पैशांची मदत करण्याची सचिनने घोषणा केल्यानंतर त्याच्या वाईकिंग वेंचर्समध्ये पूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याची पोलखोल केली आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. एका अभिनेत्याने नुकतीच काही गरिबांना मदत केली आणि त्याचा सगळीकडे गाजावाजा देखील केला. पण या सगळ्यामुळे आता हा अभिनेता चांगलाच अडचणीत सापडला आहे.

सचिन जोशी असे या अभिनेत्याचे नाव असून त्याने गरिबांच्या जेवणासाठी एका संस्थेला ३ कोटींची मदत करण्याची घोषणा केल्यानंतर त्याच्या कंपनीत पूर्वी काम करणाऱ्या लोकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या काही मजूरांना मदत करण्यासाठी पैशांची मदत करण्याची सचिनने घोषणा केल्यानंतर त्याच्या वाईकिंग वेंचर्समध्ये पूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याची पोलखोल केली आहे. त्याच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, सचिनची कंपनी सोडून त्यांना अनेक महिने झाले असले तरी त्यांना अद्याप त्यांनी काम केलेल्या अनेक महिन्यांचे मानधन मिळालेले नाही, अशात कोणी कसे काय दानधर्माचा विचार करू शकतो? एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांचे फोन देखील कंपनीतील अधिकारी तसेच सचिन उचलत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


  
सचिन हा जगदिश जोशीचा मुलगा असून जगदिशविरोधात सीबीआयने केस दाखल केली आहे. जगदिश जोशी आणि माणिकचंदचे मालक रसिकलाला धारीवालने व्यवसायाशी संबंधित काही प्रकरणं मिटवण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मदत घेतली असल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. सचिन हा नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. त्याने २०१७ मध्ये विजय माल्याचा गोव्यातील किंगफिशर व्हिला ७३ कोटीला खरेदी केला होता. सचिनने काही हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले असून उर्वशी शर्मा या अभिनेत्रीसोबत त्याने लग्न केले आहे. 

Web Title: Sachiin Joshi Backs Rs 3 Crore Donation, Former Employees Claim Non-Payment Of Dues PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.