Saaho Trailer out, fans are going crazy to see prabhas and shraddha kapoors solid chemistry | Saaho Trailer :  ‘फुल ऑन अ‍ॅक्शन’ पाहून चाहते झालेत क्रेजी, एकदा पाहाच!
Saaho Trailer :  ‘फुल ऑन अ‍ॅक्शन’ पाहून चाहते झालेत क्रेजी, एकदा पाहाच!

ठळक मुद्दे येत्या 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. 

साऊथ सुपरस्टार प्रभास, श्रद्धा कपूर स्टारर ‘साहो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचाचा ट्रेलर रिलीज झाला असून सध्या या ट्रेलरने सोशल मीडिया युजर्सला अक्षरश: वेड लावले आहे. चार भाषांमध्ये हा ट्रेलर रिलीज झाला असून तो पाहून चाहते क्रेजी झाले आहेत. ट्रेलरमधील धमाकेदार अ‍ॅक्शन पाहताना आपण थक्क होतो आणि तितकेच धमाकेदार डायलॉग्स मनाला भिडतात. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन सीन्सचा भरणा आहे.


साहोचे दिग्दर्शक सुजीत यांनी या सिनेमातील सर्व स्टंट सीनसाठी खास मेहनत घेतली आहे. या सिनेमातील अनेक सीन्स हे हॉलिवूड चित्रपटांना सुद्धा मागे टाकताना दिसतात. प्रभासनेही या सर्व अ‍ॅक्शन सीन्स खूप मेहनत घेतली  आहे. प्रभास आणि श्रद्धाचा रोमान्सचा तडखाही आहे.
ट्रेलरमध्ये साउथ सुपरस्टार प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसत आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर एका क्राइम ब्रांच आॅफिसरच्या भूमिकेत  आहे. याशिवाय यामध्ये नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर यांच्यासारखे दिग्गज अभिनेते दमदार भूमिकेत दिसत आहेत. प्रकाश बेलावडी, मंदिरा बेदी आणि मुरली शर्मा यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
 येत्या 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. 

चाहते झालेत ‘दिवाने’
‘साहो’चा ट्रेलर पाहून चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अ‍ॅक्शन पाहून अनेक चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


 


Web Title: Saaho Trailer out, fans are going crazy to see prabhas and shraddha kapoors solid chemistry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.