rohman shawl suprises shushmita sen on her 44 birthday must watch video | बॉयफ्रेन्ड रोहमनने सुश्मिताला दिले इतके सुंदर सरप्राईज, पाहा व्हिडीओ
बॉयफ्रेन्ड रोहमनने सुश्मिताला दिले इतके सुंदर सरप्राईज, पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देरोहमनने सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले असून सगळे काही जुळून आले तर नव्या वर्षांत दोघेही लग्न करू शकतात.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिने 19 नोव्हेंबरला आपला 44 वा वाढदिवस साजरा केला. पण यंदाचा वाढदिवस सुश्मितासाठी कायम स्मरणात राहणारा ठरला. कारण काय तर बॉयफ्रेन्डचे सरप्राईज. होय, सुश्मिताचा बॉयफे्रन्ड रोहमन शॉल याने सुश्मिताला वाढदिवसाचे असे काही सरप्राईज दिले की, आनंद व्यक्त करण्यासाठी तिला शब्द मिळेनात.
सुश्मिताने या बर्थ डे सरप्राईजचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहमनने सुश्मिताच्या घराच्या छतावर सुश्मिताचा वाढदिवस साजरा केला. यासाठी अख्खे छत त्याने लाईट्स आणि फुग्यांनी सजवले. एका कोवºया व्हाईट क्यूट टेंट बनवला आणि त्यात सुश्मिताचा बर्थ डे केक सजवला. सुश्मिता, रोहमन, सुश्मिताच्या दोन्ही मुली व कुटुंबीय असे सगळे या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेत.
या बर्थ डे सरप्राईजसाठी सुश्मिताने रोहमनचे आभार मानलेत. ‘थँक्स जान’ असे तिने लिहिले.


रोहमनच्या आधी सुश्मिता रितिक भसीनला डेट करत होती. मात्र दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर सुश्मिताच्या आयुष्यात रोहमनची एन्ट्री झाली. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम. गेल्या काही दिवसांत दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. रोहमन हा सुश्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे.  

रोहमनने सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले असून सगळे काही जुळून आले तर नव्या वर्षांत दोघेही लग्न करू शकतात. हेच कारण आहे की, अलीकडे सुश व रोहमन दोघेही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. सुश्मिता सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण रोमान्स आणि लूक्सच्या बातम्यांमुळे ती कायम चर्चेत असते.

Web Title: rohman shawl suprises shushmita sen on her 44 birthday must watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.