ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी रोहमनच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर सुश्मिता आणि रोहमनच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शॉल यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मध्यंतरी ब-याच गाजल्या. पण काहीच दिवसांत सुश आणि रोहमन यांनी ब्रेकअपच्या बातम्या खोट्या ठरवल्या. सध्या हे लव्ह बर्ड्स सुट्टी एन्जॉय करत आहेत. या व्हॅकेशनचे फोटो सुश व रोहमन यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. यातील एक रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो एवढा क्यूट आहे की,  या फोटोमध्ये रोहमन सुश्मिताच्या गालावर किस करताना दिसत आहे. तर सुश्मिता गोड हसत आहे.  I just love her dimples My munchkin @sushmitasen47 I LOVE YOU असे या फोटोला कॅप्शन देताना रोहमनने लिहिले आहे. 


 काही महिन्याआधी सुश्मिता आणि रोहमनने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली केली होती. सुश्मिता सेन बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून लांब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते. 

काही दिवसांपूर्वी रोहमनच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर सुश्मिता आणि रोहमनच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते.


इन्स्टाग्राम स्टोरीवर रोहमनने एका मागोमाग एक चार पोस्ट केल्या होत्या. ‘हे यू, मी तुझ्याशी बोलतोय.  तुला नेमका कशाचा त्रास होतोय? प्लीज,मला सांग, मी सर्वकाही मन लावून ऐकतोय. 24 तास,’असे पहिल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते.  दुस-या एका पोस्टमध्ये रोहमने लिहिले होते की,‘ हे नातं पुढे नेण्यासाठी तुम्ही खूप काही करत आहात आणि तुमचा जोडीदार काहीच करत नाही, असे तुम्हाला वाटते. ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी जे काही करत आहात तो तुमचा निर्णय आहे. तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्ही तशाच वागणूकीची अपेक्षा करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टी करा ज्या खरंच तुम्हाला कराव्याशा वाटतात. त्यानेही आपल्याशी तसेच वागावे यासाठी काहीही करु नका.’ 

पुढच्या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, ‘तुम्हाला वाटते की, तुमच्या जोडीदाराने तुम्हालाही तशीच वागणूक द्यावी जशी तुम्ही त्याला देता, कारण तुम्ही त्या नात्यात आहात. पण   कुणी तुमच्यासोबत चांगले वागत नाही आणि तरीही तुम्ही त्याच्यासोबत आहात तर   ही तुमची चूक आहे. म्हणून स्वत:वर प्रेम करायला शिका.’  आपल्या चौथ्या पोस्टमध्ये रोहमन भावूक झालेला दिसला होता. ‘ तुम्ही कधी एकटे राहून कंटाळता? ठीक आहे. रोज टीव्ही, फोन, पुस्तकांच्याशिवाय 15-20 मिनिटे स्वत:सोबत घालवा. स्वत:चा आवाज ऐका. यामुळे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर मिळायला सुरुवात होईल,‘असे त्याने लिहिले होते. रोहमनच्या या पोस्टमुळे त्याचे सुश्मितासोबत  काहीतरी बिनसल्याचे मानले गेले होते.


Web Title: rohman shawl and sushmita sen romantic photo is going viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.