रिया सेनच्या पाळीव कुत्र्याला चोरट्यांनी पळविले; पोलिसांत तक्रार दाखल, ५० हजारांचे बक्षीसही केले जाहीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 03:37 PM2017-12-23T15:37:53+5:302017-12-23T21:07:53+5:30

आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री रिया सेन आता भलत्याच कारणाने चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, रियाच्या नोयडा ...

Riya Sen's paternal grandmother was caught by thieves; Police filed a complaint, 50 thousand prizes were announced! | रिया सेनच्या पाळीव कुत्र्याला चोरट्यांनी पळविले; पोलिसांत तक्रार दाखल, ५० हजारांचे बक्षीसही केले जाहीर!

रिया सेनच्या पाळीव कुत्र्याला चोरट्यांनी पळविले; पोलिसांत तक्रार दाखल, ५० हजारांचे बक्षीसही केले जाहीर!

googlenewsNext
ल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री रिया सेन आता भलत्याच कारणाने चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, रियाच्या नोयडा स्थित घराच्या जवळून तिच्या कुत्र्याला काही भुरट्या चोरांनी पळवून नेले आहे. घरातील नोकर कुत्र्याला घेऊन बाहेर फिरवित असतानाच काही चोरट्यांनी त्याला चाकूचा धाक दाखवित कुत्र्याला पळवून नेले. त्याचबरोबर नोकराला जिवे मारण्याची धमकीही दिली. जेव्हा ही बाब रिया आणि तिच्या पतीला कळाली तेव्हा त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच कुत्र्याला परत आणणाºयास ५० हजार रूपयांचे बक्षीसही घोषित केले आहे.

अभिनेत्री रिया सेन, पती शिवम तिवारी आणि तिचे सासू-सासरे ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस-वे स्थित सेक्टर ९३ बीच्या ओमेक्स फॉरेस्ट सोसायटी येथे राहतात. रियाचे सासरे चिंतन तिवारी यांनी सांगितले की, मुलगा शिवमकडे अमेरिकन बुली ब्रीडचा एक कुत्रा आहे. त्याचा नोकर सायंकाळी ६ वाजता त्या कुत्र्याला सोसायटी बाहेर फिरविण्यासाठी गेला होता. त्याचदरम्यान एका कारमध्ये चार चोरटे त्याठिकाणी पोहोचले अन् नोकराला चाकूचा धाक दाखवून कुत्र्याला घेऊन फरार झाले. ही संपूर्ण घटना सोसायटी बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली आहे. 

दरम्यान, भारतात अमेरिकन बुली ब्रीड कुत्र्याची किंमत ३५ ते ५० हजारांच्या आसपास आहे. या कुत्र्याची वाढती मागणी अन् त्याची किंमत लक्षात घेता चोरट्यांनी ब्रीडिंग करण्यासाठीच या कुत्र्याला लंपास केले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. या अगोदरही नोएडा परिसरात महागड्या कुत्र्यांची चोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही प्रकरणात तर खंडणीचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, कुत्रा चोरीला गेल्यामुळे घरातील सर्व सदस्य दु:खी झाले आहेत. याच कारणामुळे रियाच्या पतीने बक्षीस म्हणून ५० हजार रूपये देण्याची घोेषणा केली आहे. 

त्याचबरोबर रिया सेनच्या परिवाराकडून एक जाहिरात प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये कुत्रा परत करणाºयाची कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा त्याचा नावाचा उलगडा केला जाणार नसल्याचे लिहिले आहे. 

Web Title: Riya Sen's paternal grandmother was caught by thieves; Police filed a complaint, 50 thousand prizes were announced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.