रिया चक्रवर्ती या अभिनेत्यासोबत गेली होती पार्टी करण्यासाठी, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 11:02 AM2021-04-10T11:02:07+5:302021-04-10T11:02:37+5:30

नुकतीच रिया चक्रवर्ती गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाली. यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

Riya Chakraborty had gone to a party with the actor, the photos are going viral | रिया चक्रवर्ती या अभिनेत्यासोबत गेली होती पार्टी करण्यासाठी, फोटो होतायेत व्हायरल

रिया चक्रवर्ती या अभिनेत्यासोबत गेली होती पार्टी करण्यासाठी, फोटो होतायेत व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे चर्चेत आली होती. आता नुकतीच ती कूल अंदाजात गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाली. यादरम्यानचे रियाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. 

नुकतीच रिया चक्रवर्ती साकिब सलीम आणि मनीष मल्होत्रासोबत गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाली. असे सांगितले जात आहे की हे कलाकार साकिब सलीमच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी भेटले होते. ही पार्टी अलिबागला झाली होती. कोरोना पासून बचाव करण्यासाठी रिया चक्रवर्तीने व्हाइट कलरचा मास्क लावला होता. 


सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आणि ड्रग्स प्रकरणात रियाचे नाव समोर आल्यानंतर आता तिचे आयुष्य पुन्हा पूर्ववत होत आहे. 

सुशांत प्रकरणानंतर रियाने सोशल मीडियाकडे पाठ वळवली होती. ऑगस्ट २०२० मध्ये रियाने शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यानंतर जवळपास ६ महिन्यांनी तिने जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत इन्स्टाग्राम पोस्ट केली होती.
गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर रिया अचानक चर्चेत आली होती. याचे कारण म्हणजे, सुशांत व रिया रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची तपास यंत्रणांनी कसून चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान ड्रग प्रकरण समोर आल्याने एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. एक महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली.


रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास रियाचा आगामी सिनेमा ‘चेहेरे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Web Title: Riya Chakraborty had gone to a party with the actor, the photos are going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.