बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती चर्चेत असते. मागील वर्षी रिया चक्रवर्तीला सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनमध्ये तुरूंगाची हवा खावी लागली होती. मात्र हळूहळू तिचे जीवन पूर्ववत होताना दिसत आहे. नुकतीच ती मुंबई एअरपोर्टवर दिसली. यावेळी तिच्यासोबत वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शौविक चक्रवर्ती उपस्थित होते. ते तिघे कुठे गेले, याबद्दल काही समजले नाही. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. ऑक्टोबरमध्ये रियाला जामीन मिळाला. त्यानंतर रिया आपले जीवन पुन्हा पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात आहे. रिया कुठेही जाते तिथे कॅमेरा तिचा पाठलाग करतात तेव्हा रिया त्यांना माझा पाठलाग करू नका असे सांगताना दिसते.


नुकतीच रिया चक्रवर्ती वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शौविक चक्रवर्तीसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. हे तिघे कुठे गेले हे समजू शकले नाही. 


दरम्यान ‘चेहरे’ची घोषणा झाली त्यावेळी या सिनेमाच्या लीड कास्टमध्ये अमिताभ, इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्तीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. रिया चक्रवर्तीने अगदी या सिनेमातील तिचा फर्स्ट लूकही शेअर केला होेता. पण पोस्टरमध्ये रिया कुठेही नाही. इमरान हाश्मीने शेअर केलेल्या ‘चेहरे’च्या पोस्टमध्ये सिनेमातील कलाकारांची नाव टॅग करण्यात आली आहेत. पण यात रियाचे नाव मिसींग आहे. रियाच्या चाहत्यांनी लगेच ही गोष्ट नोटीस केली. सोशल मीडियावर लगेच यावरच्या प्रतिक्रिया उमटल्या.


मागील वर्षी सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाकडून रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच तिच्यावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. मात्र तिला ड्रग्स प्रकरणात तिला एक महिना तुरूंगात रहावे लागले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riya Chakraborty appeared at the airport with her brother Shauvik Chakraborty and father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.