ठळक मुद्दे ऑगस्टमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहेहा सिनेमा 6 मार्च 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टायगर श्रॉफ स्टारर 'बागी 3' सिनेमा सध्या प्री-प्रॉडक्शनच्या स्टेजवर आहे. 'बागी3' मध्ये श्रद्धा कपूरसुद्धा दिसणार आहे. 2016 मध्ये आलेल्या बागीच्या पहिल्या भागाचा ती भाग होती. बागीच्या दुसऱ्या भागात टायगर श्रॉफसोबत दिशा पटानी दिसली होती. त्यानंतर तिसऱ्या भागात पुन्हा एकदा श्रद्धाची वर्णी लागल्याची चर्चा आहे.  


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, साजिद नाडियाडवाल्याच्या 'बागी3'मध्ये रितेश देशमुख महत्त्वाच्या भूमिकामध्ये दिसणार असल्याची माहिती आहे.  गेल्या महिन्यात दिग्दर्शक अहमद खान जॉर्जियाची राजधानी Tbilis मध्ये शूटिंगसाठी लोकेशन्स शोधत होते. या सिनेमात रितेश टायगरच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऑगस्टमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहे. हा सिनेमा 6 मार्च 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


याशिवाय रितेश देशमुख दिग्दर्शक मिलाप जवेरी यांच्या ‘मरजांवा’ सिनेमात बुटक्या व्यक्तिची भूमिका वठवणार आहे. या सिनेमात रितेशसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया लीड रोलमध्ये आहेत. ‘मरजांवा’ प्रेमत्रिकोण असलेली एक रोमॅन्टिक कथा आहे. ‘मरजांवा’ ट पुढील वर्षी २ आॅक्टोबरला रिलीज होईल. निखील अडवाणी हा चित्रपट प्रोड्यूस करतोय.

 सिद्धार्थ व रितेश ही जोडी याआधी एकत्र दिसली होती. ‘एक विलेन’ या चित्रपटात या जोडीने काम केले होते. या चित्रपटात रितेश निगेटीव्ह रोलमध्ये होता. पण  ‘मरजांवा’मध्ये तो एका वेगळ्या अंदाजात दिसेल. रितेशने याची तयारीही सुरू केली आहे. 


Web Title: Riteish deshmukh will seen in tiger shroff starr baaghi 3
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.