'माझी आई वाट पाहतीये..मला जाऊ द्या'; रितेश देशमुखने केली जीम ट्रेनरला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:57 PM2021-09-21T16:57:56+5:302021-09-21T17:00:51+5:30

Riteish deshmukh : रितेश सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असून अनेकदा तो त्याचे काही भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतो.

riteish deshmukh share funny video from gym leg day goes viral | 'माझी आई वाट पाहतीये..मला जाऊ द्या'; रितेश देशमुखने केली जीम ट्रेनरला विनंती

'माझी आई वाट पाहतीये..मला जाऊ द्या'; रितेश देशमुखने केली जीम ट्रेनरला विनंती

googlenewsNext
ठळक मुद्देजीम ट्रेनरने दिला रितेशला सज्जड दम

बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असतो. त्यामुळे अनेकदा इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ, फोटो शेअर करुन तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अलिकडेच रितेशने इन्स्टावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला असून त्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीत उतरत आहे.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जीममधील असून त्याचा जीम ट्रेनर त्याच्याकडून हेवी वर्कआऊट करुन घेत आहे. त्यामुळे कंटाळलेल्या रितेशने आता घरी जाऊ दे अशी विनंती या जीम ट्रेनरला केली आहे. मात्र, योग्य पद्धतीने वर्क आऊट झाल्याशिवाय घरी जाता येणार नाही, असा सज्जड दमही या ट्रेनरने रितेशला दिला आहे. विशेष म्हणजे मजेशीर अंदाजात शूट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

१० वर्षांपूर्वी अशी दिसायची पवित्रा पुनिया; फोटो पाहिल्यावर ओळखणंही आहे कठीण

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रितेश Leg Machine वर वर्कआऊट करत आहे. मात्र, कंटाळा आल्यामुळे त्याने हात जोडत 'घरी जाऊ दे आई वाट पाहत असेल',अशी विनवणी जीम ट्रेनरला केली आहे. 

दरम्यान, रितेश सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव्ह असून अनेकदा तो त्याचे काही भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतो. यात काही वेळा तो त्याच्या कुटुंबासोबतचे व्हिडीओही अपलोड करत असतो. चाहत्यांसोबत सतत संपर्कात राहण्याची त्याची हीच पद्धत नेटकऱ्यांना आवडते त्यामुळेच सध्या रितेश लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे.
 

 

Web Title: riteish deshmukh share funny video from gym leg day goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.