Video : दिवाळी पार्टीत चढला ऋषी कपूर यांचा पारा, फोटोग्राफर्सला अशी दिली तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:08 PM2019-10-28T12:08:52+5:302019-10-28T12:10:02+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा पारा कधी चढेल, हे सांगता यायचे नाही. एकता कपूरने दिलेल्या दिवाळी पार्टीत त्यांचा पारा असाच चढला.

rishi kapoor got angry on photographers at ekta kapoor diwali bash | Video : दिवाळी पार्टीत चढला ऋषी कपूर यांचा पारा, फोटोग्राफर्सला अशी दिली तंबी

Video : दिवाळी पार्टीत चढला ऋषी कपूर यांचा पारा, फोटोग्राफर्सला अशी दिली तंबी

googlenewsNext
ठळक मुद्दे नुकतेच ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरचा उपचार करून भारतात परतले.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा पारा कधी चढेल, हे सांगता यायचे नाही. एकता कपूरने दिलेल्या दिवाळी पार्टीत त्यांचा पारा असाच चढला. होय, पापाराझींवर ऋषी कपूर असे काही भडकले की, सगळेच अवाक् झालेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋषी कपूर एकता कपूरच्या पार्टीसाठी पोहोचताच फोटोग्राफर्स त्यांना कॅमे-यात कैद करण्यासाठी एकच गर्दी करतात. गोंधळ इतका वाढतो की, ऋषी कपूर यांचा संताप अनावर होतो. ‘शोर मत मचाओ,’ असे ते रागात म्हणतात. ‘हमें अपनी इज्जत रखनी है. लोग ये ना बोलें कि फिल्म वाले इतना धमाल करते है. फोटो लो जो करना है करो लेकिन शोर ना मचाओ. आपको हर तरफ मैं देखता हू. चिल्लाते रहते हो इधर देखो, उधर देखो, प्लीज ऐसा मत करो,’ असेही ते म्हणतात. अर्थात यानंतर ‘इनके बगैर हम नहीं जी सकते, हमारे बिना ये नहीं जी सकते,’ असे म्हणत ते स्थिती सांभाळतानाही दिसतात.

ऋषी कपूर त्यांच्या वादग्रस्त ट्वीटसाठी ओळखले जातात. अशाच अनेक ट्वीटसाठी ते यापूवीर्ही ट्रोल झाले आहेत. नुकतेच ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरचा उपचार करून भारतात परतले. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला रवाना झाले होते. सुमारे 11 महिने उपचार घेतल्यानंतर गत महिन्यांत ते मायदेशी परतले होते. ऋषी कपूर भारतात परतल्यावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे स्वागत केले होते. मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर यांनी ‘वेलकम होम डॅड’ असे लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर आलिया भटने त्यांच्यासाठी खास पार्टीचे आयोजन केले होते.

Web Title: rishi kapoor got angry on photographers at ekta kapoor diwali bash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.