ठळक मुद्देरश्मिका मंदानाने शेअर केलेल्या फोटोत आपल्याला तिच्या हातात एक सुंदर अंगठी पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असेत. होळीच्या निमित्ताने फॅन्सना शुभेच्छा देण्यासाठी तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण या फोटोमुळे एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

रश्मिका मंदानाने शेअर केलेल्या फोटोत आपल्याला तिच्या हातात एक सुंदर अंगठी पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत ती तिची अंगठी दाखवत असून मला तू मिळालास... असे लिहिले आहे. या फोटोवरून रश्मिकाने साखरपुडा केला का अशी चर्चा नेटिझन्समध्ये रंगली आहे. 

रश्मिकाला हे गिफ्ट दुसरे कोणी नाही तर तिच्या फॅन क्लबने दिले आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे हे सांगितले असून तिच्या फॅन्सनी दिलेल्या या प्रेमासाठी तिने त्यांचे आभार मानले आहेत. 

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात रश्मिका सोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 1970 ला घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेल्या जासूसी थ्रिलर कथेत सिद्धार्थ मल्होत्रा एक रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे.

सरीलेरू, नीकेवरू, गीता गोविंदम आणि डिअर कॉमरेड यांसारख्या अनेक चित्रपटात रश्मिकाने काम केले आहे. दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत उल्लेखनीय आणि अविस्मरणीय सादरीकरण केल्यानंतर आता रश्मिकाच्या बॉलिवूड पदार्पणावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ring on Rashmika Mandanna's finger creates rumours of her engagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.