ठळक मुद्देएप्रिलमध्ये दिल्लीत लग्न करण्याचे अली आणि रिचाने ठरवले असून लग्न 15 एप्रिलला होणार आहे.

अली फजल आणि रिचा चड्डा यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्या दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहाण्यात येते. तसेच ते दोघे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने बोलताना दिसतात. आता ते दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना ऊत आले आहे. ते दोघे 15 एप्रिलला लग्न करणार असून त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करूनच त्यांनी लग्नाची तारीख निवडली असल्याचे म्हटले जात आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिलमध्ये दिल्लीत लग्न करण्याचे अली आणि रिचाने ठरवले असून लग्न 15 एप्रिलला होणार आहे. अतिशय साधेपणाने हे लग्न करण्याचे त्या दोघांनी ठरवले असून ते कोर्ट मॅरेज करणार आहेत आणि त्यानंतर ते त्यांच्या नातलगांसाठी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी रिसेप्शन देणार आहेत. मुंबई, दिल्ली, लखनऊ अशा तीन ठिकाणी त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्याचा त्यांचा विचार आहे. अलीचे कुटंब मुळचे लखनऊ तर रिचाचे दिल्लीचे असल्याने त्यांनी आपापल्या शहरांमध्ये रिसेप्शन देण्याचे ठरवले आहे. तसेच मुंबईत त्यांच्या इंडस्ट्रीतील फ्रेंड्ससाठी ते रिसेप्शन देणार आहेत. सध्या तरी दिल्ली आणि लखनऊमधील रिसेप्शनची तारीख ठरली नसली तरी ते दोघे तिथे कोणत्या ठिकाणी रिसेप्शन द्यायचे यासाठी ठिकाणं शोधत आहेत. तसेच मुंबईत 21 एप्रिलला रिसेप्शन ठेवण्याचा त्यांचा विचार आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल जवळजवळ पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान एकत्र रेड कार्पेटवर उतरत रिचा आणि अलीने आपले नाते जगजाहीर केले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसले.

Web Title: Richa Chadha, Ali Fazal All Set to Get Married on April 15?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.