“सनम बेवफा”चित्रपटातील सलमानची हिरोईन आठवते का? “चांदनी” आजही पूर्वीसारखीच दिसते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 07:26 PM2022-01-03T19:26:16+5:302022-01-03T19:34:11+5:30

सलमान खानची(Salman khan) हिरोईन “चांदनी” पूर्वीसारखीच सुंदर दिसते.'सनम बेवफा' चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. आजही तिचे सौंदर्य अबाधित आहे.

Remember Salman Khan's Chandni Aka Navodita Sharma from Sanam Bewafa movie, even today she looks gorgeous, check Here | “सनम बेवफा”चित्रपटातील सलमानची हिरोईन आठवते का? “चांदनी” आजही पूर्वीसारखीच दिसते सुंदर

“सनम बेवफा”चित्रपटातील सलमानची हिरोईन आठवते का? “चांदनी” आजही पूर्वीसारखीच दिसते सुंदर

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे चांदनी उर्फ नवोदिता शर्मा (Navodita Sharma).

 

सुमारे 30 वर्षांपूर्वी आलेला ‘सनम बेवफा’ हा चित्रपट रसिकांना आठवतही असेल. या चित्रपटात चांदनी उर्फ ​​नवोदिता शर्मा बॉलीवूडचा दबंग सलमान खान सोबत दिसली होती. त्यादरम्यान लाखो लोक तिच्या सौंदर्यावर फिदा झाले होते. चांदनी शेवटची 1996 मध्ये आलेल्या“हाहाकार”  या चित्रपटात दिसली होती. त्यांची फिल्मी कारकीर्द खूपच छोटी राहिली.5 वर्षांच्या छोट्या करिअरमध्ये चांदनीने केवळ 10 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण 'सनम बेवफा' आणि 'हिना' वगळता तिचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले.

 

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इतक्या वर्षांनंतरही “सनम बेवफा” मधील सलमान खानची(Salman khan) हिरोईन “चांदनी” पूर्वीसारखीच सुंदर दिसते.'सनम बेवफा' चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. आजही तिचे सौंदर्य अबाधित आहे. तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.तिचे फोटो पाहताच पुन्हा एकदा चाहते तिच्या सौंदर्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. पूर्वीसारखेच लोक तिच्यावर आजही तितकेच प्रेम करतात हेच यावरुन स्पष्ट होते. 

नवोदिता शर्माने नवीन वर्षाच्या निमित्ताने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.तिचे फोटो समोर येताच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.नवोदिता शर्माने सतीश शर्मासह लग्न केल्यानंतर ती संसारात रमली.सध्या ती पती आणि मुलांसह अमेरिकेत राहते. चांदनी बर्‍याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आपले खासगी आयुष्य एन्जॉय करत आहे. चांदनी आता अमेरिकेतील ओरनाल्डो येथे डान्स क्लास चालवते आणि ती येथील लोकांना भारतीय शास्त्रीय नृत्याचे क्लासेस चालवते. 

Web Title: Remember Salman Khan's Chandni Aka Navodita Sharma from Sanam Bewafa movie, even today she looks gorgeous, check Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.