रेखा यांच्याइतकीच सुंदर आहे त्यांची छोटी बहीण, अरमान जैनच्या रिसेप्शनला लावली होती हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 05:50 PM2020-02-05T17:50:20+5:302020-02-05T17:54:31+5:30

रेखा यांची बहीण दिसायला अतिशय सुंदर असून त्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

Rekha Sister radha attended armaan jain's reception | रेखा यांच्याइतकीच सुंदर आहे त्यांची छोटी बहीण, अरमान जैनच्या रिसेप्शनला लावली होती हजेरी

रेखा यांच्याइतकीच सुंदर आहे त्यांची छोटी बहीण, अरमान जैनच्या रिसेप्शनला लावली होती हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्देअरमान जैन आणि अनीसा मल्होत्राच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली होती. या रिसेप्शन पार्टीला रेखा यांच्यासोबत त्यांची लहान बहीण राधा देखील आली होती.

अभिनेत्री रेखा खूपच कमी सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतात. त्यांना नुकतेच अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत पाहायला मिळाले. त्यावेळी त्यांच्यासोबत एक खास व्यक्ती उपस्थित होती. या खास व्यक्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही खास व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांची बहीण होती. रेखा यांची बहीण दिसायला अतिशय सुंदर असून त्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

अरमान जैन आणि अनीसा मल्होत्राच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली होती. या रिसेप्शन पार्टीला रेखा यांच्यासोबत त्यांची लहान बहीण राधा देखील आली होती. राधा अनेकवेळा रेखा यांच्यासोबत पार्टी, इन्व्हेंट मध्ये दिसतात. रेखा यांनी रिसेप्शन पार्टीसाठी एंट्री मारताच फोटोग्राफर्सने त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. त्यांचे फोटो काढत असताना राधा बाजूला उभी राहिली होती. पण रेखा यांना फोटोग्राफर्सनी विनंती केल्यानंतर राधा यांनी देखील रेखा यांच्यासोबत पोज दिली.

रेखा आणि राधा यांचे रिसेप्शन पार्टीतील हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रेखा यांनी यावेळी गोल्डन रंगाची कांजीवरम साडी घातली होती आणि त्याला साजेशे असे दागिने परिधान केले होते. या लूकमध्ये रेखा नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसत होत्या तर राधा यांनी हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. रेखाप्रमाणेच त्या देखील दिसायला अतिशय सुंदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सध्या रंगली आहे. 

रेखा यांच्याप्रमाणे राधा यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण लग्नानंतर त्यांनी अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला. गेल्या काही वर्षांपासून त्या अमेरिकेत आपल्या पतीसोबत राहात आहेत. 

Web Title: Rekha Sister radha attended armaan jain's reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rekhaरेखा