READ : शाहरूख खानबद्दल काय बोलले राकेश रोशन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 04:57 PM2017-01-17T16:57:12+5:302017-01-17T16:57:12+5:30

हृतिक रोशनचा ‘काबील’ आणि शाहरूख खानचा ‘रईस’ या दोन्ही चित्रपटांंच्या बॉक्सआॅफिसवर संघर्षाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘रईस’ आणि ‘काबील’ ...

READ: What did Rakesh Roshan talk about Shah Rukh Khan? | READ : शाहरूख खानबद्दल काय बोलले राकेश रोशन?

READ : शाहरूख खानबद्दल काय बोलले राकेश रोशन?

googlenewsNext
तिक रोशनचा ‘काबील’ आणि शाहरूख खानचा ‘रईस’ या दोन्ही चित्रपटांंच्या बॉक्सआॅफिसवर संघर्षाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘रईस’ आणि ‘काबील’ या दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर रिलीज झालेत. प्रेक्षकांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. आता यापैकी कोणता चित्रपट बॉक्सआॅफिसवर तरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  या बॉक्सआॅफिस संघर्षानंतर शाहरूख खान व रोशन कुटुंबासोबतचे संबंध ताणले गेले होते. पण कदाचित फार काळ नाही.  कारण या बॉक्सआॅफिस संघर्षामुळे रोशन कुटुंब आणि शाहरूख खान यांच्या संबंधात फार फरक पडलेला नाही. आता पुरावा काय, तर स्वत: राकेश रोशन यांनीच हे स्पष्ट केले आहे.

राकेश रोशन यांनी सांगितले की, शाहरूखच्या अख्ख्या कुटुंबासोबत माझे मधूर संबंध आहे. सन २००८मध्ये ‘क्रेझी4’ या चित्रपटाच्या शूटींगवेळची घटना आजही मला आठवतेयं. ‘क्रेझी4’मध्ये हृतिक एक स्पेशल नंबर करणार होता. पण ऐनवेळी त्याच्या गुडघ्याला इजा झाली. मी ही समस्या शाहरूखसोबत मांडली आणि त्याने लगेच हे स्पेशल नंबर करायला होकार दिला. शाहरूख एकटाच नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबासोबत माझे भावनिक संबंध आहे. शाहरूखसोबत काम करण्याचा अनुभव अद्भूत होता. भविष्यातही शाहरूखसोबत काम करायला मला आवडेल. दोन अभिनेत्यांना समान वाव असलेला एखादा सिनेमा मी केलाच तर मी निश्चितपणे शाहरूखला त्यासाठी विचारेल.
बॉक्सआॅफिसवरच्या संघर्षाबद्दलही ते बोलले.  बॉक्सआॅफिसवरच्या संघर्षाचा नात्यांवर परिणाम व्हावा, असे माझ्याबाबतीत अजिबात घडणार नाही. कारण जे माझ्या नशिबात लिहिलेले आहे, तेच माझ्या वाट्याला  येणार. माझ्या स्वत:च्या बाबतीत सांगायचे तर, एखाद्या तारखेला अन्य कुठला चित्रपट रिलीज होत असेल तर त्यादिवशी मी माझा चित्रपट चुकूनही रिलीज करणार नाही. कारण एका चित्रपटामागे अनेकांचे कष्ट  असतात. या कष्टाची किंमत मी जाणतो, असे राकेश रोशन म्हणाले. एकंदर काय, तर येत्या काळात राकेश रोशन यांच्या चित्रपटात हृतिक व शाहरूख ही जोडी आपल्याला दिसू शकते. कारण शक्यता अद्याप संपलेल्या नाहीत.

Web Title: READ: What did Rakesh Roshan talk about Shah Rukh Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.