ठळक मुद्देरवीनाने स्टारडस्ट या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय आणि तिच्या अफेअरविषयी खुलासा केला होता. या मुलाखतीत तिने सांगितले होते की, अक्षयने माझ्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते.

अक्षय कुमारचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म पंजाबमधील आहे. त्याचे खरे नाव राजीव भाटिया असून त्याचे शिक्षण हे मुंबईत झाले आहे. त्याने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मॅरिटल आर्टचे शिक्षण घेतले असून त्याने वेटर म्हणून थायलंडमधील एका हॉटेलमध्ये नोकरी देखील केली आहे. तसेच त्याने कोलकातामधील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केले आहे. पण मुंबईत परतल्यावर त्याने मॉडलिंग करायला सुरुवात केली आणि मॉडलिंगमुळे केवळ दोन दिवसांत त्याला तो महिन्याला कमावत असलेल्या पगाराइतका पैसा मिळाला आणि त्याने मॉडलिंगमध्येच करियर करण्याचा विचार केला. 

मॉडलिंग करत असताना त्याला चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आणि सौगंध या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याच्या खिलाडी या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने आजवर रुस्तम, एअरलिफ्ट, रावडी राठोड, वेलकम, ओह माय गॉड, हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याचा मिशन मंगल हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.

अक्षय कुमारच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. अक्षयचे लग्न अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत झाले असून त्यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, अक्षयचे लग्न व्हायच्याआधी रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, पूजा बत्रा यांसारख्या अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडण्यात आले होते. अक्षय आणि रवीनाच्या प्रेमकथेची तर त्याकाळी चांगलीच चर्चा झाली होती. मोहरा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जाते. त्यांचे अफेअर जवळजवळ तीन वर्षं होते. ते दोघे लवकरच लग्न करणार असे त्यांच्या चाहत्यांना वाटायला लागले होते. पण अक्षयचे त्याकाळात अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले असल्यामुळेच रवीनाने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जाते. 

रवीनाने स्टारडस्ट या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय आणि तिच्या अफेअरविषयी खुलासा केला होता. या मुलाखतीत तिने सांगितले होते की, अक्षयने माझ्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर आपण लग्न करूया असे त्याने सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raveena Tandon said in interview Akshay Kumar promised me to do marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.