रॅपर रफ्तारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह; पण म्हणाला, काहीतरी गडबड आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 10:18 AM2020-09-10T10:18:53+5:302020-09-10T10:20:33+5:30

सुप्रसिद्ध रॅपर व संगीतकार रफ्तार यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ही माहिती दिली.

rapper raftaar tests positive for coronavirus says i feel there is technical error | रॅपर रफ्तारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह; पण म्हणाला, काहीतरी गडबड आहे

रॅपर रफ्तारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह; पण म्हणाला, काहीतरी गडबड आहे

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुळे देशावर मोठं संकट ओढावलं आहे. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात आहे.

सुप्रसिद्ध रॅपर व संगीतकार रफ्तार यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ही माहिती दिली. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याने स्वत:ला होम आयसोलेट केले आहे. अर्थात आपल्यात कोणतीही लक्षणे नसल्याने हा रिपोर्ट खरा की काही तांत्रिक गडबड झालीय? असा प्रश्न त्याला पडला आहे.

आपल्या इन्स्टा स्टोरीवर चाहत्यांना माहिती देताना त्याने लिहिले, ‘मित्रांनो, मी ही बातमी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. मला रोडीजवर जायचे होते. यासाठी मला कोव्हिड-19 टेस्ट करावी लागली. पहिल्या दोन चाचण्यांमध्ये माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला. मात्र ताजा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. बीएमसीने मला आयसोलेशनमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी पुन्हा एकदा चाचणी करण्याची प्रतीक्षा करतोय. काहीतरी तांत्रिक गडबड झाली असावी, असे मला वाटतेय. कारण रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असला तरी मी फिट आणि फाईन आहे. मला अजिबात अस्वस्थ वाटत नाहीये. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे मी कोरोनाग्रस्त आहे, असे मला अजिबात वाटत नाही. कृपया काळजी करू नका. मी माझ्या तब्येतीची माहिती देत राहिल. फोन येणे सुरु झालेय. ही माहिती लोकांपर्यंत इतक्या लवकर कशी पोहोचली, याचेही आश्चर्य वाटतेय. काळजी करू नका. मी स्वत:ची काळजी घेईन. तुम्हीही स्वत:ची काळजी घ्या.’

एक डान्सर म्हणून रफ्तारने बॉलिवूडमध्ये आपले करिअर सुरु केले होते. कधीकाळी तो बॅक ग्राऊंड डान्सर होता. डान्स इंडिया डान्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो झळकला. या डान्स शोने रफ्तारला नवी ओळख दिली. ‘माफिया मुंडेर’ या बँडचा सदस्य म्हणून त्याने यो यो हनी सिंगसोबत काम करणे सुरु केले. हा बँड सोडल्यानंतर आरडीबी या पंजाबी बँडने त्याला तीन गाण्यांसाठी साईन केले आणि इथून त्याचा खरा प्रवास सुरु झाला. तमंचे पे डिस्को, तू मेरा भाई है अशा गाण्यांमुळे तो लोकप्रिय झाला.

कोरोनाचा कहर
कोरोनामुळे देशावर मोठं संकट ओढावलं आहे. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात आहे. यामध्येही मुंबई, पुणेसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. पण आता ग्रामीण महाराष्ट्रातही कोरोना डोकं वर काढत असल्याचं समोर येत आहे. सांगली, नागपूर आणि मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसंत. त्यामुळे राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे. देशात बुधवारी कोरोनाचे 89706 नवे रूग्ण आढळून आलेत. या आजाराच्या एकूण रूग्णांची संख्या आता 43 लाखांहून अधिक झाली आहे़ एकूण रूग्णांपैकी 60 टक्के रूग्ण महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक व उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील आहेत.

Web Title: rapper raftaar tests positive for coronavirus says i feel there is technical error

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.