चुलत बहिणीनेच जितेन्द्र यांच्यावर केला होता बलात्काराचा आरोप, आता कोर्टाने दिला हा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 12:06 PM2019-05-21T12:06:43+5:302019-05-21T12:09:52+5:30

 १६ फेब्रुवारी २०१८ मध्ये जितेन्द्र यांच्या चुलत बहिणीनेच त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा धक्कादायक आरोप केला होता. याप्रकरणी जितेन्द यांच्याविरोधात भारतीय दंडाधिकार कायद्यानुसार कलम ३५४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता.

Rape case FIR quashed by himachal high court against Bollywood jitendra |  चुलत बहिणीनेच जितेन्द्र यांच्यावर केला होता बलात्काराचा आरोप, आता कोर्टाने दिला हा निर्णय!

 चुलत बहिणीनेच जितेन्द्र यांच्यावर केला होता बलात्काराचा आरोप, आता कोर्टाने दिला हा निर्णय!

googlenewsNext
ठळक मुद्देसंबधित महिलेने हिमाचल डीजीपी यांना पत्र लिहित जितेन्द्र यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ही घटना १९७१ मधील असल्याचा दावा संबंधित महिलेने केला होता.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. होय, ४७ वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणात जितेन्द्र यांच्याविरोधात केलेल्या एफआयआरला हिमाचल हायकोर्टाने रद्द केले आहे. 
 १६ फेब्रुवारी २०१८ मध्ये जितेन्द्र यांच्या चुलत बहिणीनेच त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा धक्कादायक आरोप केला होता. याप्रकरणी जितेन्द यांच्याविरोधात भारतीय दंडाधिकार कायद्यानुसार कलम ३५४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. जितेन्द्र यांनी हायकोर्टात धाव घेत, हा एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती.
हे संपूर्ण प्रकरण ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचा दावा जितेन्द्र यांच्या वकीलांनी केला होता. तक्रारकर्त्याने ४७ वर्षांनंतर का नोंदवावी? असा युक्तिवाद   जितेन्द्र यांच्यावतीने करण्यात आला होता. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत शिमला येथील हॉटेलचा तसेच कोणत्या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते याचा उल्लेख केलेला नाही. तसेच दोन सह-कलाकारांची नावेही लिहिलेली नाहीत, याकडेही जितेन्द्र यांच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. हा संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर हिमाचल न्यायालयाने महिलेने केलेल्या तक्रारीत विसंगती असल्याचे सांगत, जितेन्द्र यांच्या विरोधातील एफआयआर रद्द केला.

काय आहे पूर्ण प्रकरण?

संबधित महिलेने हिमाचल डीजीपी यांना पत्र लिहित जितेन्द्र यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ही घटना १९७१ मधील असल्याचा दावा संबंधित महिलेने केला होता. तिने या तक्रारीत म्हटले होते की, तेव्हा मी फक्त १८ वर्षांची होते आणि जितेन्द्र २८ वर्षांचे होते. ते आपल्या दोन सहकलाकारांसोबत आणि ड्रायव्हरसोबत आले होते. त्यांनी कारमधून मला दिल्लीवरून शिमल्यापर्यंत नेले. आम्ही शिमल्याला पोहोचलो तेव्हा ते थेट मला हॉटेलवर घेऊन गेले. मी बाहेर फिरायला जात असून, लवकर परत येतील, असे सांगून जितेन्द्र बाहेर गेले. मी फार थकलेले होते, त्यामुळे मी झोपून गेले. मध्यरात्री कधीतरी जितेन्द्र दारूच्या नशेत परतले आणि त्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला.


फंस्री ूं२ी ऋकफ ०४ं२ँी िु८ ँ्रेंूँं’ ँ्रॅँ ूङ्म४१३ ंँ्रल्ल२३ इङ्म’’८६ङ्मङ्म ्न्रि३ील्ल१िं

Web Title: Rape case FIR quashed by himachal high court against Bollywood jitendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.