फेसपॅक लावलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखण्यासाठी सोशल मीडियावर लागली स्पर्धा, तुम्ही ओळखले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:51 PM2020-02-19T15:51:06+5:302020-02-19T15:51:14+5:30

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक कलाकार फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो.

Ranveer's Face Pack Picture Viral On Social Media | फेसपॅक लावलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखण्यासाठी सोशल मीडियावर लागली स्पर्धा, तुम्ही ओळखले का?

फेसपॅक लावलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखण्यासाठी सोशल मीडियावर लागली स्पर्धा, तुम्ही ओळखले का?

googlenewsNext

सध्याचे कलाकार मेंटेन राहण्यासाठी आपल्या बॉडीवर हे कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. बॉडी पिळदार ठेवण्यासाठी, ऍब्ज कमावण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी कलाकार जिममध्ये घाम गाळत असतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक कलाकार फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो. आजपर्यंत फिटनेसचे व्हिडीओ फोटो आपण पाहिले आहेत. मात्र ब्युटी थेरपी घेत असल्याचा फोटो पहिल्यांदाच या अभिनेत्याने शेअर केला आहे. रणवीर सिंहचा फेसपॅक लावलेला एक फोटो समोर आला आहे. 


हा फोटो पाहून हसू आवरणेही कठिण असून आता हेच बाकी होते अशा कमेंटस या फोटोंवर येत आहे. अनेकदा अतरंगी हरकती करत सा-यांच्या नजरा आकर्षित करणा-या रणवीरने त्याचा हा फोटो पोस्ट केला आहे. यावर पत्नी दीपिका पदुकोणनेही भन्नाट प्रतिक्रीया दिली आहे. तिने म्हटले की, तुम्ही पाहून शकता रणवीर सिंह क्लियोपेट्रामध्ये खूप व्यस्त आहे. दीपिकाच्या या कमेंटवर रणवीरदेखील स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. त्याने लिहिले, 'माझ्या सतेज त्वचेचे रहस्य तर... तूच आहेस.'


दोघांच्याही अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर दीपिका-रणवीरसोबत '83' मध्ये दिसणार आहे. तसेच ऋषी कपूरसोबत 'द इंटर्न' च्या रीमेकमधेही दिसणार आहे.

  

Web Title: Ranveer's Face Pack Picture Viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.