ठळक मुद्देरणवीरने सोशल मीडियावर या चाहत्यासोबतचे चार फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. जतीन दुलेरा हा रणवीरचा खूप मोठा चाहता होता. तो रणवीरचे सगळे चित्रपट आवर्जून पाहायचा. तसेच त्याने अनेकवेळा त्याची भेट देखील घेतली होती.

रणवीर सिंग आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असून त्याने गेल्या काही वर्षांत एकामागोमाग एक असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गली बॉय आणि सिम्बा या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला होता. रणवीरला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून सोशल मीडियावर तर त्याचे फॅन्स त्याला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.

रणवीरसाठी त्याचे चाहते हे खूप खास आहेत आणि तो त्यांना खूपच चांगल्याप्रकारे वागवतो. तो आपल्या फॅन्ससोबत फोटो काढायला, त्याच्यांसोबत गप्पा मारायला कधीपण तयार असतो. त्यामुळे त्याच्या फॅन्ससोबत त्याचे एक वेगळेच नाते आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या एका फॅनचे निधन झाले आहे. हा फॅन रणवीरच्या खूप जवळचा असून त्याच्या निधनाची बातमी कळताच रणवीरला प्रचंड वाईट वाटले आहे.

रणवीरने सोशल मीडियावर या चाहत्यासोबतचे चार फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. जतीन दुलेरा हा रणवीरचा खूप मोठा चाहता होता. तो रणवीरचे सगळे चित्रपट आवर्जून पाहायचा. तसेच त्याने अनेकवेळा त्याची भेट देखील घेतली होती. मात्र नुकतेच जतीनचे आकस्मिक निधन झाले. जतीन ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत असताना बाथरूममध्ये गेला. पण तिथे त्याचा अचानक श्वास कोंडला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याचा यात मृत्यू झाला. त्याच्या निधनाविषयी कळताच रणवीरने त्याच्यासोबतचे फोटो इन्स्टावर शेअर करून त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यासोबत RIP LIL HOMIE असे लिहिले आहे. 

रणवीर सध्या 83 या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीसाठी खूपच खास आहे. तो या चित्रपटात आपल्याला कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटात त्याची खरी पत्नी दीपिका पादुकोण त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी तो गेल्या कित्येक दिवसांपासून मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी धर्मशाला येथे कॅम्प देखील आयोजित करण्यात आला होता. 


Web Title: Ranveer Singh's fan passes away; actor pays last respects
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.